सिंधुदुर्ग जिल्ह्यांसांठी ड्रोन सुविधा केंद्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यांसांठी ड्रोन सुविधा केंद्र

rat०९७.txt

बातमी क्र. ७ ( टुडे पान १)

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसांठी ड्रोन सुविधा केंद्र

आंबा, काजू बागायतदारांना लाभ ; चार लाखांपर्यंत अनुदान

रत्नागिरी, ता. ९ ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेतून पहिल्या टप्प्यात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना ड्रोन आणि ड्रोन सुविधा केंद्र मंजूर करण्यात आली आहे. याचा फायदा कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना होणार आहे.
कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लक्ष लागून असलेली ड्रोन सुविधा केंद्राची योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. रखडलेल्या या योजनेतील अडथळे दूर करून प्रस्तावानुसार ही योजना मंजूर करताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना प्रत्येकी एक ड्रोन दिला जाणार आहे. ड्रोनसाठी पहिल्या टप्प्यात एकूण एक कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये केव्हीके, कृषी विद्यापीठे, आयसीएआरची केंद्रे, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्थांना केंद्र शासनाकडून १०० टक्के म्हणजे दहा लाखांपर्यंत अनुदान मिळेल. शेतकरी उत्पादक कंपनीला चार लाखांपर्यंत अनुदान, तर कृषी पदवीधारकांना भाडेतत्त्वावर केंद्र उघडण्यासाठी ५ लाख रुपये मिळतील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ड्रोन खरेदीसाठी पाच लाखापर्यंत, तर इतर शेतकऱ्यांना चार लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्‍या टप्प्यात या अनुदानांअतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हा कृषी विभागाकडून दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये ड्रोन उडवण्याची प्रात्यक्षिकेही घेतली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोन वापरण्याचे महत्व लक्षात आले होते. त्यांनी ड्रोन घेण्याची तयारीही दर्शविली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com