मिनी मॅरेथॉन स्पर्धेत शिल्पा केंबळे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिनी मॅरेथॉन स्पर्धेत शिल्पा केंबळे प्रथम
मिनी मॅरेथॉन स्पर्धेत शिल्पा केंबळे प्रथम

मिनी मॅरेथॉन स्पर्धेत शिल्पा केंबळे प्रथम

sakal_logo
By

फोटो :rat9p32.jpgKOP23L87979
दापोली : मॅरेथॉन स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या महिला स्पर्धक

मिनी मॅरेथॉन स्पर्धेत शिल्पा केंबळे प्रथम
दाभोळ : जेसीआय दापोली व द फर्न समाली रिसॉर्ट ,दापोली, उपजिल्हा रुग्णालय, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दापोलीतील महिला, विद्यार्थिनी व युवतींसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात 148 महिला सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेत शिल्पा केंबळे यांनी प्रथम, संजना हरावडे यांनी द्वितीय तर स्नेहा भाटकर यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. उत्तेजनार्थचे पारीतोषिक राखी थोरे व विद्या मुलुख यांना देण्यात आले.या स्पर्धेची सुरुवात दापोली शहरातील आझाद मैदान येथे झाली. नॅशनल हायस्कूल, रसिक रंजन नाट्यगृह, गुड लक स्टोअर्स, एसटी स्टँड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्टेट बँक ऑफ इंडिया, व परत आझाद मैदान असा या स्पर्धेचा मार्ग होता.प्रशस्तीपत्र, रोख रक्कम व सन्मान चिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी जेसीआय दापोलीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

महिला दिन हा केवळ उत्सव राहता नये
दाभोळ : महिला दिन हा केवळ उत्सव न राहता महिलांचे खरेखुरे सक्षमीकरण व्हायला हवं आणि त्यासाठी केवळ महिला दिन नाही तर पुरुष दिन साजरा करून त्यांचेही प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे विचार ज्येष्ठ समाजसेविका रेखा बागुल यानी मांडले.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून कर्णबधीर आणि बहु विकलांग विद्यार्थ्यांसाठी पुनर्वसन केंद्र चालविणाऱ्या रेखा बागुल '' स्त्री जीवन काल आज आणि उद्या '' या विषयावर व्याख्यानात बोलत होत्या. बागुल यांनी जुन्या भारतीय संस्कृतीतील स्त्री जीवनाचा आढावा घेऊन आजच्या आणि उद्याच्या मुलींनी आणि स्त्रियांनी बदलेल्या नव्या जमान्याचा डोळसपणे विचार करण्याची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कैलास गांधी यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील पूर्वपिठिका सांगून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. ऋजुता जोशी यांनी केले तर ग्रंथपाल कीर्ती परचुरे यांनी आभार मानले.