उद्धव ठाकरे गटातर्फे कुडाळात आज रॅली

उद्धव ठाकरे गटातर्फे कुडाळात आज रॅली

ठाकरे गटाची कुडाळात आज रॅली
कुडाळः कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त उद्या (ता. १०) सायंकाळी ४.३० वाजता भव्य रॅलीचे आयोजन आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी केले आहे. दरवर्षी कुडाळ कार्यालयात शिवजयंती साजरी करत असताना आमदार नाईक यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यातून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचे काम होत असते. या अनुषंगाने उद्या शहरात भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन शहरप्रमुख शिरसाट, कुडाळ उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर यांनी केले आहे.
............
वाडातर येथे भजन स्पर्धा
देवगडः तालुक्यातील वाडातर येथील तरुण विकास मंडळ आयोजित श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्ताने येत्या ५ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. पहिल्या तीन विजेत्या भजन संघांना अनुक्रमे ५५५५, ३३३३ व २२२२ रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपली नावे रामचंद्र चोपडेकर बुवा यांच्याकडे नोंदवावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com