दाणोलीनगरीत दुमदुमला साटम महाराजांचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाणोलीनगरीत दुमदुमला साटम महाराजांचा जयघोष
दाणोलीनगरीत दुमदुमला साटम महाराजांचा जयघोष

दाणोलीनगरीत दुमदुमला साटम महाराजांचा जयघोष

sakal_logo
By

swt926.jpg
88017
दाणोली : पुण्यतिथीनिमित्त साटम महाराज यांची सजविण्यात आलेली उत्सवमूर्ती,
swt927.jpg
88018
दाणोली : दर्शनासाठी भक्तांची समाधी मंदिर परिसरात लागलेली रांग. (छायाचित्रे ः रुपेश हिराप)

दाणोलीनगरीत दुमदुमला
साटम महाराजांचा जयघोष
पुण्यतिथी उत्सव ः दर्शनासाठी भक्तांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८६ वा पुण्यतिथी उत्सव आज भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. यावेळी साटम महाराजांच्या जयघोषाने अवघा दाणोली परिसर दुमदुमून गेला.
आंबोली-बेळगाव महामार्गाला लागून श्री साटम महाराजांचे समाधी स्थळ तसेच त्यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. योगियांचे योगी असलेल्या सद्गुरू श्री साटम महाराजांचे भक्त सर्वदूर आहेत. दाणोलीनगरीत उत्सवानिमित्त दरवर्षी भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. यावर्षीही सर्व भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त आज सकाळपासूनच दाणोलीनगरीमध्ये भक्तांची हजेरी लागली होती. समाधी मंदिर परिसरात तसेच साटम महाराजांच्या निवासस्थानी भक्तांची गर्दी होती. प्रत्येकाच्या मुखात महाराजांचा जयजयकार ऐकू येत होता. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. समाधी मंदिर ट्रस्टकडून भाविकांना सुलभ दर्शनासाठी योग्य नियोजन करण्यात आले. समाधी स्थान महामार्गाला लागून असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न होता. दुपारी महाप्रसादासाठी भक्तांची प्रचंड गर्दी लोटली होती. दिवसभर मंदिरात भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू होते. रात्री पालखी परिक्रमा तसेच अन्य कार्यक्रमांना भक्तांनी मोठी गर्दी केली होती.