कणकवलीत कर्तृत्‍ववान महिलांचा सत्‍कार

कणकवलीत कर्तृत्‍ववान महिलांचा सत्‍कार

88163
कणकवली : येथील पदर प्रतिष्‍ठानच्या महिला दिन कार्यक्रमात नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्‍वान महिलांचा सत्‍कार केला.


कणकवलीत कर्तृत्‍ववान महिलांचा सत्‍कार

महिलादिनाचे निमित्त; पदर प्रतिष्‍ठानचा पुढाकार, स्पर्धांचे बक्षीस वितरण

कणकवली, ता.१० : जागतिक महिला दिनाच्या औचित्‍यावर शहरातील लक्ष्मीण विष्णू मंगल कार्यालयात पदर प्रतिष्‍ठानच्यावतीने महिला दिनाचा कार्यक्रम झाला. यात शहर आणि परिसरातील कर्तृत्‍ववान महिलांचा सत्‍कार नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याहस्ते करण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. अश्विनी नवरे, डॉ. प्रिती पावसकर, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला धानजी, उपजिल्‍हा रूग्‍णालयातील परिचारिका अधीक्षक नयना मुसळे, स्नेहलता राणे यांचा विशेष सत्‍कार करण्यात आला. तसेच काबाडकष्ट करुन नवऱ्याच्या पश्चात किंवा कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा भार उचलून मुलांना शिक्षण देणाऱ्या स्नेहा सातवसे, रश्मी परब, उमा घाडी, विजया सरुडकर- शेट्ये, साक्षी शिंदे यांचाही विशेष सन्मान झाला. या कार्यक्रमावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गवाणकर, भाजपा प्रदेश सदस्या तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, नगरसेविका सुप्रिया नलावडे, कविता राणे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, भाजप शहराध्यक्षा प्राची कर्पे, प्रियाली कोदे, हर्षदा वाळके, विनिता बुचडे, राजश्री धुमाळे आदी उपस्थित होते.
---------
चौकट
पाककलेत चेतना मांगे, प्रियाली कोदे प्रथम
पाककला स्पर्धेत चेतना मांगे आणि प्रियाली कोदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मिताली माणगावकर हिने द्वितीय तर शिवप्रिया हिर्लेकर तृतीय क्रमांक मिळवला. शर्वरी जाधव व मंजिरी वारे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या स्पर्धेचे परीक्षण अमित टकले आणि प्रवीण तायशेटे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com