अभय योजनेमुळे लहान व्यापाऱ्यांना फायदा

अभय योजनेमुळे लहान व्यापाऱ्यांना फायदा

rat१०२४.txt

अभय योजनेमुळे लहान व्यापाऱ्यांना फायदा

ललित गांधी ; महाराष्ट्र चेंबरने केले अर्थसंकल्पाचे स्वागत

रत्नागिरी, ता. ११ : राज्याच्या अर्थसंकल्पात व्यापारी, उद्योगासाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत. भांडवली गुंतवणूकीतून पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मितीमुळे विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली.
गांधी म्हणाले, वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकी तडजोड योजना जाहीर केली आहे. या नवीन अभय योजनेत कोणत्याही वर्षासाठी, व्यापाऱ्यांची थकबाकी २ लाखांपर्यत असल्यास ही रक्कम पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याचा सुमारे १ लाख लहान व्यापाऱ्यांना लाभ होणार आहे. थकबाकी ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास ८० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. त्याचाही सुमारे ८० हजार मध्यम व्यापारी बंधूना लाभ होणार आहे.
उद्योगांना आवश्यक मनुष्यबळासाठी १० उत्कृष्टता केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. ५०० आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २३०७ कोटी रुपये आणि ७५ आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी ६१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रोजगारनिर्मिती सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा विभागासाठी ११ हजार ६५८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लॉजिस्टिक पार्कचे लवकरच धोरण निश्चित होणार आहे. कोकण काजू प्रक्रियासाठी १३५० कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. त्यामध्ये विशेषत: उद्योग विभागासाठी ९३४ कोटी रुपये, वस्त्रोद्योगला ७०८ कोटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभागासाठी ७३८ कोटी रुपयांची केलेली तरतूद स्वागतार्ह असल्याचे अध्यक्ष गांधी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com