आंबा पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

आंबा पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

rat११२२.txt

फोटो ओळी
-rat११p१५.jpg-
८८३३१
कोतवडे (ता. रत्नागिरी) ः कोतवडे येथे मार्गदर्शन करताना प्रकल्प उपसंचालक आत्मा उर्मिला चिखले.
--

कोतवडेत आंबा पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

पावस ः कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम झाला. यामध्ये आंबा पीक व्यवस्थापनवर विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला कोतवडेचे सरपंच संतोष बारगुडे, आत्म्याच्या प्रकल्प उपसंचालक उर्मिला चिखले, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, पणन महामंडळाचे पणन तज्ञ कपिल खामकर, तालुका कृषी अधिकारी एन. पी. भोये उपस्थित होते. डॉ. संतोष वानखेडे यांनी आंबा पीक व्यवस्थापन तसेच काजू व नारळ पीक व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. कपिल खामकर यांनी आंबा पणन व्यवस्थापन, महामंडळाच्या विविध योजना, आंबा महोत्सवाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. चिखले यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना व कृषी पायाभूत निधी योजना याविषयी मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार वाघमारे यांनी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व व पौष्टिक तृणधान्य वर्ष याची माहिती दिली.
--

वेळणेश्वर महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची निवड

गुहागर ः वेळणेश्वरमधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले आहे. महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्यावतीने एकदिवसीय कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतभर विस्तार असलेली कोर इंडिया प्रोजेक्ट कंपनीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कॅम्पस मुलाखत घेतले. यामध्ये महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या एकूण १३ विद्यार्थांची निवड झाली. यामध्ये साहिल जाधव, कौशल्य साठे, गणेश मूरकर, युवराज जाधव, अजय गुरव, प्रफुल्ल रसाळ, ब्रह्मानंद काळे, धीरज साळवी, सोहम खातू, आदिती बागकर, श्रुतिका पवार, सागर जड्यार, रूतिका पवार इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
--

ओणनवसेत आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन

दाभोळ ः ओणनवसे येथील आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ओणनवसे येथील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्याने उद्घाटन कार्याक्रमात राजकीय धुळवड पाहायला मिळाली. ओणनवसे येथे आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या उपकेंद्राची इमारत बांधण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणाऱ्या अब्दुल ममतुले यांचाही सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कट्टर समर्थकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.
--
सव्वाशे महिलांचा सन्मान

दाभोळ ः जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून दापोली नगरपंचायतीच्यावतीने शहरात पदपथावर व्यवसाय करणाऱ्या महिलांचा नगराध्यक्ष ममता मोरे यांनी सन्मान केला. दापोली नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दापोलीत मारूती पूल, मारूती मंदिरासमोरील गल्ली, बाजारपेठ, सन्मान हॉटेल समोरील गल्ली, बसस्थानक, मच्छीमार्केट आदी भागात पदपथावर वस्तूंची विक्री करणाऱ्या सुमारे १२५ महिलांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या वेळी महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी लांजेकर, समाजकल्याण समिती सभापती रिया सावंत, योगिता गायकवाड, गार्गी रेगे, हर्षदा माने, सायली भंडारी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com