कसालमध्ये आज आरोग्य शिबिर

कसालमध्ये आज आरोग्य शिबिर

कसालमध्ये आज आरोग्य शिबिर
कुडाळ ः पोलिस खात्यात अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावून वयोमानानुसार सेवेतून कार्यमुक्त झाल्यानंतर स्वतःच्या आरोग्याकडे व शरीराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणून निवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनमार्फत उद्या (ता. १२) सकाळी साडेनऊला कसाल-बालमवाडी येथील साई माऊली बॅक्वेट हॉल येथे या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. आरोग्य शिबिराला येताना सर्वांनी उपाशीपोटी येण्याचे आवाहन निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी केले आहे. दुपारी बाराला स्नेहमेळावा होणार आहे.
---
मडुरा येथे आज आगळा ‘कुटुंबोत्सव’
बांदा ः मडुरा येथे शिमगोत्सवानिमित्त उद्या (ता. १२) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे चारला आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण असा कुटुंबोत्सव साजरा होणार आहे. भाविकांना वर्षभरातून एकदा केवळ या सोहळ्यात श्री होरडेश्वर देवाचे दर्शन होते. नवस बोलणे व फेडण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. सायंकाळी देवाच्या कौलाने व धुळवडीने शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान उपसमितीमार्फत केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com