पुरस्कार

पुरस्कार

‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’स
साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
---
लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला सन्मान
नवी दिल्ली, ता. ११ : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला.
येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळा झाला. नामवंत साहित्यिक उपमन्यू चटर्जी प्रमुख पाहुणे होते. साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा, सचिव के. श्रीनिवास राव यांच्यासह २४ भाषांतील पुरस्कारार्थी साहित्यिक व्यासपीठावर होते.
मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या प्रायोगिक कादंबरीला वर्ष २०२२ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकणी भाषेसाठी माया खरंगटे यांना त्यांच्या कोकणी भाषेतील ‘अमृतवेळ’ या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला.
‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही एक प्रायोगिक कादंबरी आहे. या कादंबरीचा विषय समकालीन संस्कृतीवरच्या संकटाचे नाट्यमय चित्रण केलेले आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात लोकप्रिय असलेल्या चित्रकथीसारख्या लोककला प्रकारांचा उत्कृष्ट वापर केल्याने कादंबरीचे कथन तंत्र नावीन्यपूर्ण झालेले आहे. कादंबरीत अधूनमधून कोकणी आणि गोव्यातील बोलींच्या कलात्मक वापराने कादंबरीची कथनशैली समृद्ध झाली आहे. स्वतःची ओळख हरवून बसलेल्या विचारवंतांच्या नोस्टॅलिजीयाचे चित्रण अतिशय संवेदनशीलतेने केलेले आहे. या सर्व कथनामुळे ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही मराठी साहित्यकृती विशेष ठरली आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखक बांदेकर कवी व समीक्षक आहेत. त्यांचा जन्म वेंगुर्ला येथे झाला. ते सावंतवाडी येथील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com