बेलोसे महाविद्यालयाची नवी इमारत

बेलोसे महाविद्यालयाची नवी इमारत

rat१३१३.TXT


फोटो ओळी
- rat१३p२.jpg-
८८७३७
दापोली ः ''इंदुमती लक्ष्मणराव यादव इमारत’ चे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष संजय जगताप.
-
बेलोसे महाविद्यालयात बीएससीसाठी नवीन इमारत

हर्णै ः वराडकर-बेलोसे महाविद्यालयातील बीएससी (आयटी) साठी नव्याने सज्ज झालेल्या ‘इंदुमती लक्ष्मणराव यादव इमारत’ चे उद्घाटन संस्थेचे नूतन अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. दापोली तालुक्यातील काजू उद्योजक धनंजय यादव यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती इंदुमती लक्ष्मणराव यादव यांच्या नावाने वराडकर-बेलोसे महाविद्यालयास बीएससी आयटी या कोर्सच्या इमारतीच्या बांधकामासाठी १० लाख रु. देणगी दिली होती. या अभ्यासक्रमाची स्वतंत्र इमारत बांधून झाली आहे. या इमारतीचे नामकरण ‘इंदुमती लक्ष्मणराव यादव इमारत’ असे करण्यात आले. इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. मुंबई विद्यापीठाचा बीएससी (आयटी) हा पदवी अभ्यासक्रम येथे होणार आहे. धनंजय यादव हे उद्योजक असून त्यांचा वळणे यथे काजू फॅक्टरी-कोकण फळप्रक्रिया व हॉटेल व्होल्गा तर कुर्ला येथे लक्ष्मणराव यादव यांच्या नावाने भाजीमार्केट आहे. उद्योग-व्यवसायात सुमारे २०० पेक्षा अधिक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या वेळी सभापती शिवाजी शिगवण, उपसभापती प्रियदर्शन बेलोसे, विश्वस्त कासमभाई महालदार, डॉ. दशरथ भोसले, डॉ. भारत कऱ्हाड, अनंतराव सणस, सुनीता बेलोसे, मीना कुमार रेडीज, सुनील चव्हाण, सुरेश पवार आदी उपस्थित होते.
-

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा

गुहागर ः तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे १ ते ३ मार्च असे तीन दिवस महाविद्यालयाच्या विद्युत आणि इंस्ट्रुमेंटेशन (उपकरणीय) विभागांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थात प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलरवर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेसाठी भाभा परमाणू संशोधन केंद्रातील निवृत्त ज्येष्ठ संशोधक बीएसवीजी शर्मा हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले. सलग तीन दिवस संपूर्ण दिवसभर चाललेल्या या अभिनव कार्यशाळेत शर्मा यांनी पीएलसी संदर्भातल्या शक्य तेवढ्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या. पीएलसीचा उगम, त्याचे फायदे, प्रोग्रामिंग, लॅडर डायग्रॅम या आणि अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या. त्यावर आधारित एक प्रश्नमंजुषासुद्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच काही छोटे प्रायोगिक तत्वावर विद्यार्थ्यांना पीएलसी हाताळण्यास देऊन छोटे प्रकल्प साकारत येतील, असे प्रात्यक्षिकसुद्धा घेतले गेले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या विद्युत आणि इंस्ट्रुमेंटेशन या विभागाच्या सुमारे ५०हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता.
-

वडद येथे मिशन कंपोस्टचे उद्घाटन

गुहागर ः तालुक्यातील वडद येथे मिशन कंपोस्ट गुहागर २०२३ चे औपचारिक उद्घाटन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. परचुरी-वडद पालखी भेट सोहळ्यादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मोबाईल श्रेडरद्वारे कोकणातील प्रमुख बायोमास (झावळ्या, सोडणे, गवत, पातेरा) हे श्रेडरद्वारे बारीक करून दाखवण्यात आले. कोकणातली बागायती आणि शेती गेली कित्येक वर्षे वणव्याच्या झळा सोसत आहेत तसेच सतत वाढणाऱ्या खतांच्या किमतींमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यावर या मिशन कंपोस्टद्वारे कायमचा तोडगा निघावा यासाठी माय कंपोस्ट पुणेचे कौस्तुभ गोविंद येद्रे प्रयत्नशील आहोत. यंदाच्या शिमगोत्सवात हे प्रात्यक्षिक कृषी विभागामार्फत नाबार्डच्या सौजन्याने गुहागर तालुक्यातील विविध भागात करण्यात येणार आहे. या वेळी वडद विकास आघाडीचे कार्याध्यक्ष सोमनाथ गावणंग, भालचंद्र जोगळे, संदीप धनावडे, प्रगतशील शेतकरी रमेश भुवड, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, प्रमोद गवारी व वडद, परचुरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
-

चिपळुणात मोफत ह्रदय तपासणी

चिपळूण ः येथील माधवबाग क्लिनिक आणि हेल्प फाउंडेशनच्यावतीने मोफत ह्रदय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नेरोलॅक पेंटस कंपनीच्या सहकार्याने हा आरोग्यविषयक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरातील खेंड भागातील माधवबागच्या क्लिनिकमध्ये या तपासण्या सुरू आहेत. महिला दिन पार्श्वभूमीवर नेरोलॅकचे संदीप दत्त व नंदन सुर्वे यांच्या हस्ते या आरोग्य उपक्रमाची सुरवात झाली. या शिबिरात स्ट्रेस टेस्ट, एसपीओटू, ईसीजी यासह हृदयाच्या महत्वाच्या तपासण्या करण्यात येत आहेत. माधवबागच्या डॉ. राधा मोरे व त्यांच्या सहकारी दीपिका सकपाळ या सर्व उपक्रम हाताळत आहेत. या वेळी हेल्प फाउंडेशन अध्यक्ष सतीश कदम व माधवबाग व स्प्रिंग क्लिनिकचे संचालक डॉ. यतीन जाधव यांनी स्वागत केले. या प्रसंगी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दीपक शिंदे, सदस्या वर्षा खटके, पद्मा ओली, माजी नगरसेविका सीमा चाळके आदी उपस्थित होते.

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com