चिपळूण ः  नांदिवसेत आढळला भरसाठ लाकूडसाठा

चिपळूण ः नांदिवसेत आढळला भरसाठ लाकूडसाठा

(कच्ची रेडी केली.)

पान १ साठी

८८८३४
८८८३६
८८८३५

जागोजागी लाकडाचे ढीग; नोंद १२ घनमीटरची
---
नांदिवसेत वन खात्याची कारवाई; ओवळी येथेही मोठ्या प्रमाणात लाकूडतोड
चिपळूण, ता. १३ ः सह्याद्री खोऱ्यातील नांदिवसे गावात जळाऊ लाकडाचे जागोजागी रचलेले ढीग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. वनविभागाने याची तत्काळ दखल घेत लाकूडसाठ्याची चौकशी केली असता अवघा १२ घनमीटर साठा आढळून आला; मात्र नांदिवसेसह ओवळी गावातही मोठ्या प्रमाणात लाकूडतोड झाली आहे. त्या ठिकाणी वनविभागाकडून चौकशी उशिरापर्यंत सुरू होती.
दोन वर्षांपूर्वी चिपळुणात आलेल्या महापुरानंतर लाकूडतोडीचा मुद्दा कळीचा ठरला होता. अधिवेशनातदेखील हा विषय लावून धरला. सह्याद्रीच्या खोऱ्यात वारंवार जंगलतोड होत असल्याने डोंगर उताऱ्यांवर जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. भूवैज्ञानिक व काही पर्यावरण अभ्यासकांनीदेखील या विषयी परखड मत व्यक्त करत प्रशासनाने लाकूडतोडीविषयी ठोस कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर लाकूडतोडीवर काहीसे नियंत्रण आले. त्याशिवाय सह्याद्री खोऱ्यातील काही गावात जमिनीला तडे जाणे भेगा पडण्याचे प्रकार घडल्याने ग्रामस्थ जागरूक झाले होते; परंतु आता लाकूडतोड पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सह्याद्री खोऱ्यातील आडमार्गावर जंगलतोड करून जळाऊ स्वरूपाचे लाकूड विक्रीसाठी नेले जाते. यामुळे डोंगरउतार उजाड झाले आहेत.
खासगी जमिनीमध्ये लाकूडतोड होते. त्यासाठी गावातूनच रस्ते व अन्य सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. यामध्ये काही स्थानिक पुढारी व जमीनदारांचा समावेश आहे. सोशल मीडियावर लाकूडतोडीचे फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. नांदिवसे येथे अनेक दिवसांपासून लाकूडतोड सुरू असून त्याची रितसर तक्रार वनविभागाकडे झाली आहे. त्यानुसार वनविभागाने चौकशी केली असता १२.२७५ घनमीटर लाकूडसाठा आढळला. या प्रकरणी नांदिवसे गणेशपूर येथील मंगेश मधुकर शिंदे यांच्यावर ७५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. नांदिवसेसह नजीकच्या ओवळी गावातदेखील जंगल भागात जागोजागी लाकूड रचून ठेवले आहेत. याविषयी स्थानिकांमधून ओरड सुरू झाल्याने वनविभागाने ओवळीतही चौकशी सुरू केली आहे.

कोट
वनविभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार, नांदिवसे येथे पाहणी केली असता तेथे १२.२७५ घनमीटर लाकूडसाठा आढळला. हा जळाऊ स्वरूपाचा लाकूडसाठा असून त्याची परवानगी नसल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. ओवळी भागातही लाकूडसाठ्याची माहिती मिळाली असून तिथे चौकशी सुरू केली आहे.
- राजश्री कीर, परिक्षेत्र वनाधिकारी, चिपळूण


दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वनविभागाने नीतिगत धोरण अवलंबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे.
- प्रमोद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com