महामार्गाचे काम तातडीने करा

महामार्गाचे काम तातडीने करा

swt१३३९.jpg
८८८९४
मुंबईः महामार्ग संदर्भात सर्वपक्षीय आमदार बैठकीत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण. सोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर व आमदार.

महामार्गाचे काम तातडीने करा
रखडलेले काँक्रिटीकरण ः सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ः मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पाडली. या बैठकीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार जयंत पाटील, आमदार भरत गोगोवले, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर आदी आमदार उपस्थित होते. तर आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रविण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदी लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. महामार्गाचे काम १० पॅकेजेसमध्ये सध्या सुरू आहे. त्यापैकी ५ पॅकेजेचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेचे काम प्रगतीपथावर आहे. चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. चौपदरीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील कासू ते पनवेल या सुमारे ४२ किलोमीटरच्या महामार्गावरील एका लेनचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. याच महामार्गावरील दुसऱ्या लेनच्या रस्त्यावरील खड्डे लवकरच भरण्यात येतील. या रस्त्याचे पॅचवर्क तसेच आवश्यक काँक्रिटीकरणाचे काम लवकर करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.
.................
चौकट
अपूर्ण कामांचे होणार शूटिंग
चौपदरीकरणांतर्गत जी काही रखडलेली कामे शिल्लक आहेत, ती लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर काम करण्यात येईल. नॅशनल हायवे ऑथोरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वयाचा राखण्याच्या सूचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. जे काम अपूर्ण राहिले, त्या सर्व कामाची प्रगती पाहण्याच्या दृष्टीने या कामाचे शूटिंग ड्रोनच्या साहाय्याने करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.
...............
चौकट
भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने करण्याचे निर्देश
पऱशुराम घाटाचे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने हा घाट किमान सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. त्यामुळे या घाटातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असलेला चेळणीचा पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल. ज्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे, ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात येतील, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
...................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com