राजापूर ः पुरोगामी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पेढांबकर

राजापूर ः पुरोगामी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पेढांबकर

फोटो ओळी
- rat१४p२७.jpg- यशवंत पेंढाबकर KOP२३L८८९५४
- rat१४p२८.jpg- विठ्ठल कुटेकर KOP२३L८८९५५
- rat१४p२९.jpg- प्रकाश पाध्ये KOP२३L८८९५६

पुरोगामी शिक्षक संघटनेच्या
जिल्हाध्यक्षपदी पेढांबकर
नवी कार्यकारिणी जाहीर ः जुनी कार्यकारिणी बरखास्त
राजापूर, ता. १४ ः महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी यशवंत पेढांबकर (चिपळूण), सरचिटणीस विठ्ठल कुटेकर (दापोली) तर राज्य कार्याध्यक्षपदी (हंगामी) प्रकाश पाध्ये (राजापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
पुरोगामी शिक्षक संघटनेची चिपळूण येथे जिल्हा कार्यकारिणीची विशेष सभा संघटनेचे राज्य प्रमुख सल्लागार विनायक घटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पाटील म्हणाले, काही जिल्हा पदाधिकारी संघटना सोडण्याचे काहीही कारण नसताना इतर संघटनेत गेले. त्यामुळे पूर्वीची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली तसेच नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी यापुढे अधिकृतरित्या संघटनेचे कामकाज पाहील तसेच पुरोगामी विचाराचा वारसा जपणारी पुरोगामी शिक्षक संघटना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिली असून भविष्यातही शिक्षकांचे जिल्हा व राज्यपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. विनायक घटे यांनी संघटनेचा पाया मजबूत असल्याने कोणीही खचून न जाता जोमाने कार्य सुरू ठेवावे, असे आवाहन केले. सुरेश साळवी, प्रदीप पवार यांनीही मार्गदर्शन केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पाध्ये यांनी तर आभार चंद्रशेखर कोतवडेकर यांनी मानले तर सूत्रसंचालन शशिकांत सपकाळ यांनी केले. सभेस महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य सचिव रंगराव वाडकर, राज्य संघटक पी. आर. पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, कोल्हापूर जिल्हा नेते गोविंद पाटील, माजी महिला राज्य सरचिटणीस पूजा वीरकर व रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


चौकट

कार्यकारिणीत निवडलेले पदाधिकारी
निवडण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीत जिल्हा नेते प्रदीप पवार (चिपळूण), कोषाध्यक्ष महेश मोरे (गुहागर), प्रमुख संघटक चंद्रशेखर कोतवडेकर (चिपळूण), प्रमुख सल्लागार सुरेश साळवी (राजापूर), यशवंत पाडावे (लांजा), महिला प्रमुख सल्लागार पूजा विरकर (चिपळूण), महिला जिल्हा संघटक तेजल पेढांबकर (चिपळूण), श्वेता सकपाळ (खेड), जिल्हा उपाध्यक्ष विनोद घडशी (खेड), रवींद्र चव्हाण (गुहागर), पांडुरंग डाकरे (खेड), तालुकाध्यक्ष दापोली विठ्ठल कुटेकर (प्रभारी), खेड विनोद घडशी (प्रभारी), चिपळूण-शशिकांत सपकाळ, गुहागर-महेश मोरे (प्रभारी), लांजा-नितीन कोलते, राजापूर-रंगराव चौगुले यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com