खेड पोलिसांनी केला देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

खेड पोलिसांनी केला देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

rat१४४१.txt

फोटो
- rat१४p६९.jpg-
८९१०९
खेड पोलिसांनी मद्य साठ्यासह एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

खेडमध्ये मद्यसाठा जप्त

खेड, ता. १४ ः खेड पोलिसांनी छापे टाकून देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. छाप्यांमध्ये केळणे गवळवाडी-आंबडस येथील एका दुकानाचा पाठीमागील बाजूस असणाऱ्या खोलीत १ हजार २५० विविध देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. १ लाख २२ हजार ५०० किंमतीचा हा मुद्देमाल असून तो जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, पोलिसांना १२ मार्चला ही माहिती मिळाली होती. त्याआधारे खेड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे व त्यांच्या पथकामार्फत केळणे गवळवाडी-आंबडस येथे देशी-विदेशी मद्यसाठा करणाऱ्यावर छापे टाकण्यात आले. केळणे गवळवाडी-आंबडस येथील एका दुकानाच्या पाठीमागील बाजूस असणालेल्या खोलीत एकूण १ हजार २५० विविध देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या आढळुन आल्या. १ लाख २२ हजार ५०० किंमतीचा हा मुद्देमाल आहे. पोलिसांनी तो जप्त केला असून संशयित अमित सदानंद करंजकर (वय ३९ वर्षे, रा. आंबडस) याला ताब्यात घेतले.त्याच्यावर खेड पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोतवाडीत दुसरा छापा
खेडमधीलच खोतवाडी येथील दुसऱ्या छाप्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या संशयित संतोष ज्ञानेश्वर मोरे याला २ हजार २३० किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. तसेच खेड पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com