‘सत्यशोधक’चा संपास पाठिंबा

‘सत्यशोधक’चा संपास पाठिंबा

‘सत्यशोधक’चा संपास पाठिंबा
कणकवली ः सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे पुकारलेल्या बेमुदत संपाला सत्यशोधक शिक्षक सभेने पाठिंबा दिला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष महेश पेडणेकर व सचिव शंकर जाधव यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा संविधानात्मक अधिकार आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन ही शासनाची मेहरबानी नसून कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक विनाखंड सेवेचा आणि त्याला म्हातारपणी जगण्याचा हक्क आहे. शासन कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या लाभापासून विकलांग करण्याचे कटकारस्थान करत आहे. या भूमिकेला सत्यशोधक शिक्षक सभेचा विरोध आहे. म्हणूनच या संपास सत्यशोधक शिक्षक पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे, केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत असावे आदी मागण्याही केल्या आहेत.
--
सावंतवाडी दूरसंचारच्या समस्यांची दखल
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग, गोवा या दूरसंचारच्या रिझनमधील विविध समस्या जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाचे चीफ जनरल मॅनेजर रोहित कुमार यांनी काल (ता. १४) भेट दिली. गोवा येथील दूरसंचारच्या कार्याला भेट दिल्यानंतर त्यांनी येथील जिल्हा दूरसंचारच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी कुमार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरसंचार विभागाची आजची स्थिती तसेच मोबाईल टॉवर आदींबाबत सविस्तर माहिती घेतली. दूरसंचारमध्ये काही बदल करता येईल का, याबाबतही सविस्तर चर्चा केली. दूरसंचार प्रबंधक जन्नू यांनी त्यांचे स्वागत केले. दूरसंचार विभागाची आजची स्थिती पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूरसंचार विभाग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. तसेच गावागावात मोबाईल टॉवर केंद्र मंजूर झाले असून ते टॉवर उभारण्यासंदर्भात चर्चा झाली.
---
सावंतवाडीत २० पासून हस्ताक्षर सुधार वर्ग
सावंतवाडी ः येथील माठेवाडा येथे २० ते २५ मार्च या आठवड्याच्या कालावधीत दुपारी तीन ते सायंकाळी पाच दरम्यान सातवी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी दीर्घ मुदतीच्या सुटीचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने देवनागरी लिपी हस्ताक्षर सुधार वर्गाचे आयोजन केले आहे. या वर्गामध्ये हस्ताक्षर मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांचे कलागुण विकसित व्हावे, यासाठी ‘व्यक्तिमत्व विकास’ विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या वर्गाचे मार्गदर्शक शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणेचे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केलेले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी अथवा पालकांनी विकास गोवेकर, ‘अक्षर’ अ ५७ माठेवाडा, सावंतवाडी या पत्त्यावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन हस्ताक्षर सुधार मंडळाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com