स्वामिनी बचतगट महिलांचा 
आरोस-दांडेली येथे सत्कार

स्वामिनी बचतगट महिलांचा आरोस-दांडेली येथे सत्कार

89231
आरोस : स्वामिनी बचतगटाच्या महिलांचा सत्कार करताना रेखा गायकवाड.

स्वामिनी बचतगट महिलांचा
आरोस-दांडेली येथे सत्कार
सावंतवाडी, ता. १५ ः आरोस-दांडेली येथील माउली कर्णबधिर निवासी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. व्यासपीठावर प्रज्ञा जोगळेकर, सौ. नारकर तसेच विशेष उपस्थिती म्हणून स्वामिनी बचतगट, वेंगुर्लेच्या अध्यक्षा श्वेता हुले, महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा गायकवाड उपस्थित होत्या.
प्रथम दीपप्रज्वलाने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या प्रवासी होडी वाहतूक या व्यवसायात पदार्पण करत असताना आलेल्या समस्यांचे वर्णन करताना श्वेता हुले यांना व्यवसायातील अनुभव कथन केले. सौट नारकर यांनी चूल आणि मुल ही संकल्पना बाजूला सारून प्रवासी होडी वाहतूक संघटनेसाठी बचतगटाच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या बचतगटाच्या १० धडाडीच्या महिलांचे कौतुक केले. संस्थेच्या अध्यक्षा गायकवाड यांच्या हस्ते शाल व श्रीफळ सन्मानपत्र देऊन माऊली महिला मंडळाच्या वतीने स्वामिनी बचतगटाच्या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मनीषा गायकवाड, स्मिता गायकवाड तसेच संस्थेचे हितचिंतक प्रशांत भाट आणि वृद्धावस्थेतही सक्षमपणे मेस चालविणाऱ्या श्रीमती बांदेकर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका सौ. काळे यांनी केले. श्री. हुद्दार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com