कोकण रेल्वे वाहतुकीत माकडांचा व्यत्यय

कोकण रेल्वे वाहतुकीत माकडांचा व्यत्यय

rat१५३.TXT

विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांपुढे माकडांचे आव्हान

कोकण रेल्वे ः अँटी क्लाइंबिंग उपकरणांसाठी निविदा

रत्नागिरी, ता. १५ ः कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन गेल्या वर्षी त्याचे लोकार्पण देखील झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल कोकण रेल्वेची प्रशंसादेखील केली. कोकण रेल्वेच्या याच विद्युतीकरण पूर्ण केलेल्या मार्गावर विद्युत इंजिनसह गाड्यादेखील धावू लागल्या आहेत. मात्र, विद्युतीकरणासाठी उभारलेले पोर्टल्स तसेच मास्टर्स यावर जवळपासच्या रानातली माकडे उड्या मारू लागल्याने कोकण रेल्वेला त्यांना रोखण्यासाठी लाखो रुपयांची निविदा काढावी लागली आहे.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर या विभागातील ओएचई पोर्टल्स तसेच मास्टर्स यावर माकडे चढून उड्या मारू लागल्याने या विभागात विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावर रेल्वेगाड्या चालतात त्या रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युतप्रवाह सुरू असल्याने रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे. माकडांमुळे रेल्वेच्या विद्युत प्रवासात खंड पडू नये व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कोकण रेल्वेने सुमारे ६ लाख ६२ हजार ६६३ रुपये इतक्या अंदाजित खर्चाची निविदादेखील काढली आहे. यामध्ये कोकण रेल्वेच्या माकड प्रवण भागामध्ये त्यांना रोखण्यासाठी रत्नागिरी ते राजापूर या भागात अँटी क्लाइंबिंग उपकरणे कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com