रत्नागिरी-19 वर्षांच्या मेहनतीनंतर अ. के. देसाईला यश

रत्नागिरी-19 वर्षांच्या मेहनतीनंतर अ. के. देसाईला यश

rat१५१८. txt

- rat१५p१४.jpg ः
८९१९५
योगेश पवार, संतोष गार्डी, साईप्रसाद शिर्सेकर, प्रवीण धुमक, निखिल भुते.

१९ वर्षांच्या मेहनतीनंतर अ. के. देसाई हायस्कूल यश

मुख्याध्यापक प्रमोद शेखर ः रत्नागिरीच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे झालेल्या १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल संस्थेच्या ''राखेतून उडाला मोर'' बालनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला. देसाई हायस्कूलच्या सांस्कृतिक परंपरेतील १९ वर्षांच्या मेहनतीचे फळ या निमित्ताने मिळाले, अशी माहिती निर्मिती प्रमुख व मुख्याध्यापक प्रमोद शेखर यांनी दिली. या नाटकाने रत्नागिरीच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा खोवल्याचे त्यांनी सांगितले.
बालनाट्यासाठी दिग्दर्शन द्वितीय, नेपथ्य प्रवीण धुमक द्वितीय, संगीत निखिल भुते प्रथम व प्रकाशयोजना साईप्रसाद शिर्सेकर प्रथम अशी चार पारितोषिके या नाटकाने पटकावली. कोल्हापूर येथील प्राथमिक फेरीत द्वितीय क्रमांक पटकावून हे नाटक अंतिम नाट्य स्पर्धेत प्रवेश केला होता. एका दुर्गम भागातील शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असलेल्या मुलांची ही कथा बालनाट्यातून साकारली. स्मशानभूमी परिसरात झोपडी बांधून राहणार कुटुंब. त्यांचा उदरनिर्वाह फक्त प्रेतासाठी आणलेल्या अन्नातूनच होत असतो. प्रेत जाळण्याच्या नवीन पद्धतीमुळे त्यांना अन्न मिळणेही शक्य होत नाही; त्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची ओढ, श्रीमंत मुलांकडून होणारा अपमान अशा गोष्टींमुळे शिक्षण घेणाऱ्या मुलांची जिद्द कमी करतात. मुलांचा ध्यास आणि शासनाचे प्रयत्न यामुळे दुर्गम भागातील गरीब मुले शिक्षणात पुढे जातात.
या नाटकातील बालकलाकार ः रखी- तनया लिंगायत, निवाद्या-अथर्व गोणबरे, मसण्या-भावेश खरात, रापी-सुखदा गावकर, सल्ली रितू आखाडे, बा- अमन जाधव, सटवी आणि विद्यार्थी-प्राजक्ता लवंदे, मडक्या-अनिल थापा, आर्यन-विकास देवांगण, महेक-महेक मुल्ला, विद्यार्थी-पार्थ जांभळे आदी या नाटकांसाठी अभिनयाची चुणूक दाखवली. या बालनाट्यासाठी संगीत निखिल भुते, प्रकाशयोजना साईप्रसाद शिर्सेकर, यश सुर्वे, नेपथ्य प्रवीण धुमक, दत्ताराम घडशी, रंगभूषा नरेश पांचाळ, वेशभूषा अंजली पिलणकर, रंगमंच व्यवस्था व्यास गावंड, अक्षय सावंत, सानिका वाडेकर, अलिशा जाधव, बबलू शर्मा, सुत्रधार दुर्वेश सागवेकर, विशेष आभार ओंकार पाटील, स्वानंद मयेकर आदींची साथसंगत होती.

*खूप छान अनुभव होता

प्रत्येक छोटी बाब ध्यानात ठेवून सर्वांनी परिश्रम घेतले. फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने परिश्रम केले की यश तुम्हाला शोधत येते. तसच काहीसं झालं. मला तर काही क्षण विश्वास बसत नव्हता; पण घेतलेली मेहनत ही फळाला आली. माझ्या सर्व टीमचे खुप धन्यवाद, असे पारितोषिक विजेते संगीत दिग्दर्शक निखिल भुते यांनी सांगितले.

*संहितेला छान बनवण्यासाठी परिश्रम घेतले

नेपथ्यमधील सर्व गोष्टींचा पूर्ण आणि पुरेपूर उपयोग कसा होईल याकडे कल असतो. हे करत असताना प्रत्येकजण आपापल्या स्तरावर घेत असलेली मेहनत बघून मला अजून हुरूप आला आणि संहितेला अजून छान कसं बनवता येईल यासाठी परिश्रम घेतले. त्याचे फळ आज सर्वांना मिळाले, असे नेपथ्यला द्वितीय पारितोषिक मिळालेल्या प्रवीण धुमक यांनी सांगितले.

*बालनाट्यासाठी साजेसा लाईट

आयुष्यात काही स्वप्न असतात. आपण प्रयत्न करत असतो आणि नकळत ती पूर्ण होतात. राखेतून उडाला मोर या बालनाट्याची स्टोरी कळल्यावर त्याला लागणारा साजेसा लाईट कला, अभिनय व रंगभूषेशी तंतोतंत जुळला. तो परीक्षकाच्या मनात भरला व प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक मिळाले, असे साईप्रसाद शिर्सेकर याने सांगितले.

*विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे यश

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालनाट्य विभाग शाळेत कार्यरत आहे. सातत्याने राज्यस्तरीय यशासाठी प्रयत्न करत होतो. राखेतून उडाला मोर या नाट्याने मिळवलेले यश निश्चितच कायम स्मरणात राहील. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाचे हे यश आहे. विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्ययन, अध्यापन सांभाळून नाटकाचा सराव घेतला जातो. सर्व बालकलाकार न कंटाळता उत्कृष्ट नाटकसाठी प्रयत्न करत होते. नाट्य दिग्दर्शक ओंकार पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे यश संघात असणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या मेहनतीचे आहे. मराठा मंदिर संस्थेचे पाठबळही तेवढेच आहे, दिग्दर्शक संतोष गार्डी यांनी सांगितले.

कोट
मराठा मंदिर संस्थेच्या रत्नागिरी येथील ''अ. के. देसाई हायस्कूल'' शाळेचा संस्थाचालक म्हणून मला अभिमान आहे. हे यश एका शाळेपुरते सिमित नसून संपूर्ण जिल्ह्याचे आहे. या यशात विद्यार्थ्यांनी घेतलेली अपार मेहनत आणि त्यांना मिळालेले शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन वाखाणण्याजोगे आहे. संतोष गार्डी यांनी अनेक वर्षे नाट्य प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे मराठी शाळांमध्येही उपजत क्षमता असते.

- योगेश पवार, अध्यक्ष, मराठा मंदिर संस्था
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com