शिक्षणाचा उपयोग कृषी विकास, देश समृद्धीसाठी करा

शिक्षणाचा उपयोग कृषी विकास, देश समृद्धीसाठी करा

शिक्षणाचा उपयोग कृषी विकासासाठी करा
राज्यपाल रमेश बैस; कोकण कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ
दापोली, ता. १५: शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी त्या ज्ञानाचा उपयोग राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आणि देशाच्या कृषी विकासासह करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदानप्रसंगी ते बोलत होते.
श्री. बैस म्हणाले, देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतीला अधिक महत्व प्राप्त होणार असून येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी न विकता त्यामधूनच अर्थार्जन करणे आवश्यक आहे. एकवेळ उपाशी राहिला तरी चालेल; पण जमिनी विकू नका. भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादन यांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे. विद्यार्थ्यांनी कृषी पदवी घेतली हा एक भाग झाला; पण त्याचे प्रात्यक्षिक शेती करूनच केले गेले पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना गुणवत्तायुक्त कृषी निविष्ठा, बि-बियाणे, खते, कीटकनाशके तसेच योग्यवेळी तांत्रिक मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी त्याकडेही जाणीवपूर्वक पाहणे ही काळाची गरज आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती झाल्या आता देश आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे.
प्रमुख अतिथी डॉ. एस. अय्यपन यानी जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे.

चौकट
विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
या समारंभात राज्यपाल महोदय यांच्या हस्ते ३४ पीएचडी १०५ पदव्युत्तर पदवी आणि २ हजार १०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात वर्ष २०२०- २१ आणि २१- २२ अंतर्गत सुवर्णपदक विजेत्यांचाही राज्यपालांहस्ते गौरव करण्यात आला. इतर क्षेत्रातील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

चौकट
सर्व सर्व रिक्त पदे भरणार
विद्यापीठाचे प्रतिकूलपती व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आगामी काळात कृषी विद्यापीठांमधील सर्व सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. कृषी विभागांतर्गत सर्व पदे भरली जातील याची काळजी शासन घेत आहे असे सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यानी आजवर झालेल्या विद्यापीठातील संशोधनांची माहिती सादर केली तसेच विद्यापीठ राबवित असलेले विविध उपक्रम आणि संशोधने याबाबत माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com