जिल्हास्तर नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

जिल्हास्तर नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

swt165.jpg
89407
मिठमुंबरीः खुल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेतील विजेती मृणाल सावंतला गौरविताना उमेश तारी व अन्य.

जिल्हास्तर नृत्य स्पर्धेत
मृणाल सावंत विजेती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः देवगड तालुक्यातील बागवाडी उत्कर्ष मंडळ, मिठमुंबरी आयोजित खास शिमग्याच्या लळितानिमित्त  झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पिंगुळी येथील मृणाल सावंत विजेती ठरली.
स्पर्धेचे आयोजन श्री देव मांडकरी देवालय बागवाडी यांच्यावतीने करण्यात आले. द्वितीय नेहा जाधव (इन्सुली), तृतीय क्रमांक इशा गोडकर (शिरोडा) हिने मिळविला. उत्तेजनार्थ भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी), सायली राऊळ (पिंगुळी), शंकर गवस (दोडामार्ग), कीर्ती तारी (मिठमुंबरी बागवाडी), पूर्वा मेस्त्री (कणकवली), समर्थ गवंडी (रेडी), तन्मय आईर (कुडाळ, पिंगुळी) यांनी मिळविला. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत 27 स्पर्धक सहभागी झाले. परीक्षण संजय पांचाळ, श्वेता मिठबावकर यांनी, निवेदन संजय धुरी यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष उमेश तारी, सचिव प्रमोद आडकर, खजिनदार लिलाधर तारी, उपाध्यक्ष नारायण तारी, सहसचिव विजय नेसवणकर, सहखजिनदार आप्पा नेसवणकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. शिमगोत्सवाच्या लळितानिमित्त संपूर्ण रात्र विविध कार्यक्रमांनी जागविण्यात आली. यामध्ये नृत्य स्पर्धेसह गायनाचा कार्यक्रमही झाला. यात अनिल सादये, विघ्नेश सादये, राकेश मिठबावकर यांनी विविध गीते सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. किशोर सादये यांनी सोंग साकारले. नारद गिरीश तारी यांनी नाट्यगीते सादर केली. त्यांना संगीत साथ हार्मोनियम सुरेश सादये, तबला विघ्नेश सादये यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com