युवकांचे आयडॉल ः नीलेश राणे

युवकांचे आयडॉल ः नीलेश राणे

डोके - मा. नीलेश राणे वाढदिवस विशेष
.....................................
swt१६१.jpg
89401
नीलेश राणे
swt१६२.jpg
89404
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत माजी खासदार नीलेश राणे, विशाल परब आदी.
swt१६३.jpg
89405
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबत नीलेश राणे.

युवकांचे आयडॉलः नीलेश राणे

लीड
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे या नावातच ताकद आहे. कोकणातल्या वाडीवस्तीपासून अगदी मुंबईतील संवेदनशील राजकारण आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाचा प्रॅक्टीकल अभ्यास असणारे हे नेतृत्व. सत्ता असो किंवा नसो, जनतेच्या संपर्कात राहुन, प्रसंगी पदरमोड करून त्यांना आधार देणारे हे आपुलकीचे नेतृत्व आणि भल्याभल्यांच्या नौटंकीचा तत्काळ पर्दाफाश करणारे हे सडेतोड नेतृत्व. त्यांचा वाढदिवस शुक्रवारी (ता. १७) साजरा होत आहे. यानिमित्ताने...
- श्री. दादा साईल
भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष

................
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विचार आणि कार्याचा वारसा चालवणारे नीलेश राणे म्हणजे एक झंझावात आहे. कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणेचा आणि अखंड उर्जेचा स्त्रोत आहे. नवीन कार्यकर्ते जोडण्याचे आणि त्यांना आपलेसे करण्याचे मोठे कौशल्य त्यांच्यात आहे. राजकारणातला साचेबध्दपणा आणि तेच तेच घासून गुळगुळीत झालेले शब्द त्यांच्याकडे नसतात. ते बोलतात ते स्पष्ट आणि सडेतोड. म्हणूनच केवळ कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात युवा वर्गात त्यांचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. नव्या पिढीला राजकारणाची जी नवी भाषा हवी, तीच भाषा नीलेश यांच्या प्रत्येक भाषणात आणि सोशल मीडियावर येत असते. पोटात एक आणि ओठात एक, अशी त्यांची भूमिका आजवर कधीच दिसली नाही.
या नेतृत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आपण कितीही मोठे असलो तरी त्यांचे पाय जमिनीवर असतात. लहान- मोठ्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये ते आपुलकीने मिसळतात. त्यांची विचारपूस करतात. इतकेच नव्हे, तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान राखत त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेत असतात. समाजाच्या सर्व स्तरांत त्यांचा अगदी मायेने, आपुलकीने वावर असतो. थेट वाडीवस्तीवर जाऊन ते सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेत असतात. ते सोडविण्याठी मुंबई-दिल्लीपर्यंत स्वतः पाठपुरावा करत असतात. जिथे थेट तातडीने मदतीची आवश्यकता असेल, तिथे ते पदरमोड करून आधार देत असतात. बेरोजगारी हटवणे, पर्यटन, उद्योग यांसह मूलभूत सुविधा क्षेत्रातही त्यांचे काम लक्षणीय आहे. केवळ निवडणूक आणि सत्ता यापुरते नव्हे, तर या दोन्ही बाबी नसतानाही आपले कार्यकर्ते आणि सामान्य जनतेसाठी सतत झटणारे नीलेश अलीकडच्या काळातल्या राजकारण्यांसाठी एक आदर्श आहेत.
आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अथकपणे फिरताना दिसतात. त्यांचे हेच कार्य आणि कामाचा धडाका पाहुन भाजपचे प्रदेश सचिव पद त्यांच्याकडे सोपविण्यात आले. या पदाच्या माध्यमातूनही संघटना वाढीसाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. भाजपच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवत आहेत. राजकारणात आपला करिष्मा दाखवायचा तर विचार, अभ्यास, अनुभव यासोबतच सडेतोड भूमिका, स्पष्टवक्तेपणा आणि अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची ताकद हवी. नीलेशजींच्या व्यक्तिमत्वात या सर्व बाबी असल्यामुळेच आज ते राज्याच्या राजकारणातही रोज चर्चेत असतात. कुणाच्या टीकेवर बोलायचे आणि कुणाला किंमत द्यायची नाही, याचा मुत्सद्दीपणाही त्यांच्याकडे दिसून येतो. कोकण आणि मुंबईत जिथे विशेषतः राजकीय कौशल्याचा कस लागतो, अशा नेत्यांच्या यादीत नीलेश यांचे खूप वरचे स्थान आहे.
आज एकाच वेळी मालवण-कुडाळमधील भेटीगाठी आणि विकासकामांचा पाठपुरावा करण्यासोबतच राज्याच्या राजकारणातही ते सक्रीय आहेत. एक सक्षम आणि ''पावरफुल्ल'' नेतृत्व असलेले आणि प्रशासनाला योग्य वळण देण्याची धमक आणि ताकद असलेले हे नेतृत्व सामान्य जनतेला आज आपला लोकप्रतिनिधी म्हणून हवे आहे. कार्यकर्त्यांची मजबूत, कार्यक्षम फळी आणि स्वतः कर्तबगार असलेले हे व्यक्तिमत्व निश्चितच या परिसराचा अल्पावधीत कायापालट करणार, हा विश्वास आज जनतेत निर्माण झाला आहे. राजकारणाची समीकरणे बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. प्रशासनाला जनतेच्या हितासाठी राबवण्याची धमक त्यांच्यात आहे. म्हणूनच आज कोकणवासीयांची मोठी जनशक्ती एकमुखाने त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा भविष्यकाळ तर उज्ज्वल आहेच; परंतु आम्हा कोकणवासीयांच्या जीवनातही आता परिवर्तनाचा प्रकाश पेरणारे एकमेव झंझावाती नेतृत्व आहे, ते म्हणजे नीलेश राणे. पुढील वाटचालीसाठी तसेच वाढदिवसानिमित्त नीलेश राणे यांना विशाल सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
...............
चौकट
89428
विशाल परब

कोट
संपूर्ण महाराष्ट्रात युवकांचे आयडॉल, युवा नेतृत्व, तरुणांचे स्फूर्तिस्थान, कोकणचे युवा नेतृत्व म्हणून भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे पाहिले जाते. ते तरुणांचे आयडॉल तर आहेत, शिवाय माझे राजगुरूही आहेत. त्यांच्या संपर्कात आल्यापासून ते आजतागायत त्यांचा आदर्श जोपासून वाटचाल करताना राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रांत आमचे प्रेरणास्थान म्हणून ते आहेत. गेली दहा वर्षे त्यांचा १७ मार्च हा वाढदिवस सोहळा आम्ही सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध उपक्रमांनी संपूर्ण जिल्ह्यात साजरा करतो. माणगाव खोऱ्यात भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. गेल्या वर्षी कुडाळ नवीन डेपोच्या मैदानावर चाललेली भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा त्याचबरोबर विविध नामांकित उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी भव्य अशा ''शिवगर्जना'' या महानाट्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हे महानाट्य सर्वांसाठी मोफत असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.
- विशाल परब, युवा उद्योजक तथा अध्यक्ष, विशाल सेवा फाउंडेशन.


(पुरवणी संकलन - अजय सावंत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com