''संस्कार'' स्कूलमध्ये रंगपंचमी उत्साहात

''संस्कार'' स्कूलमध्ये रंगपंचमी उत्साहात

swt1612.jpg
89427
निरवडेः संस्कार नॅशनल स्कूलमध्ये मुलांनी रंगपंचमी साजरी केली.

‘संस्कार’ स्कूलमध्ये रंगपंचमी उत्साहात
सावंतवाडीः होळी व रंगपंचमी सणाचे औचित्य साधून निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये नैसर्गिक रंगांची उधळण करत रंगपंचमी उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. प्रशालेचे संस्थापक डॉ. शेखर जैन यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांना रंग लावून होळीच्या व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. विविध रंगांनी प्रशालेचा सर्व परिसर रंगमय झाला होता. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमीचा आनंद घेतला. कृत्रिम रंगांचा आरोग्यावर किती घातक परिणाम होऊ शकतो यांसह पाणी जपून वापरावे व पाण्याचा अपव्यय टाळावा, असे मोलाचे संदेश दिले. विविध नैसर्गिक रंग व सोबतीला रंगपंचमीची गाणी यावर सर्व विद्यार्थ्यांचे पाय थिरकले. शेवटी सर्व विदयार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
...............
swt1614.jpg
89429
आंबोलीः कान्हाजी गावडे यांचा सत्कार करताना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी.

कान्हाजी गावडेंचाआंबोलीत सत्कार
आंबोली : खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील कट्टर शिवसैनिक कान्हाजी गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, संजय पडते तसेच पदाधिकाऱ्यांसह आंबोली विभागीय अध्यक्ष बबन गावडे, बुधाजी पाताडे, बाळा कोरगावकर, काशिराम राऊत आदी उपस्थित होते.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com