राजापूर-फळबाजारातील आंब्याचा दर निम्म्यावर

राजापूर-फळबाजारातील आंब्याचा दर निम्म्यावर

फोटो ओळी
-rat१६p१४.jpg ःKOP२३L८९४१७ आंब्याचे सुरू असलेले वर्गीकरण
-rat१६p१५.jpg ः KOP२३L८९४१८ भरलेल्या पेट्या.


दृष्टिक्षेपात ः

* आंबा हंगामाला शुभारंभाच्या प्रतिकूल हवामानाचा फटका
* आंबा उत्पन्न सरासरी ४० टक्के
* शुभारंभाला चार डझन पेटीला ८-९ हजार रुपये दर
* दरामध्ये घसरण होऊन तो ४ ते ५ हजार
* उत्पन्नातून खर्चही भागवणे होणार मुश्किल


फळबाजारातील आंब्याचा दर निम्म्यावर
हवामानाचा फटका ; बागायतदारांचे अर्थकारण बिघडणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः प्रतिकूल हवामानाचा फटका बसून यावर्षी आंबा हंगाम सुमारे ४० टक्क्यावर आला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील बहुतांश माल बाजारपेठेत विक्रीसाठी गेल्याने संपत आला आहे. दुसर्‍या टप्प्यातील आंबा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विक्रीसाठी येईल. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये फळबाजारातील आंब्याचा दर निम्म्यावर आला आहे. आंबा हंगामासाठी केलेला खर्चही उत्पन्नातून भागवणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे आंबा विक्री दरामध्ये वाढ न झाल्यास त्याचा जास्त फटका विशेषतः रत्नागिरी आणि देवगड (सिंधुदुर्ग) हापूस आंब्याला बसणार असून, यातून कोकणातील बागायतदारांचे अर्थकारण पुरते डबघाईस येणार आहे.
कोकणामध्ये गेल्या काही वर्षापासून आंबा हंगामाला प्रतिकूल स्थिती राहत आहे. त्यामध्ये यावर्षीही फारसा बदल झालेला दिसत नाही. त्यातूनही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये फुलोरा येऊन तयार झालेला पहिल्या टप्प्यातील कोकणातील विशेषतः रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची बाजारपेठेत विक्री सुरू आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील बहुतांश आंबा विक्री संपली आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेल्या मोहोरातून फळधारण होऊन तयार झालेला दुसर्‍या टप्प्यातील आंबा आता थेट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विक्रीसाठी बाजारपेठेत जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची एप्रिल महिन्यातील बाजारपेठेतील आवक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घटणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील आंबा विक्रीवर उत्पन्नाच्यादृष्टीने कोकणातील बागायतदारांचा जादा भर असतो. मात्र, याच टप्प्यामध्ये दर घसरताना सद्यःस्थितीमध्ये ८-९ हजार आंबापेटीचा असलेला दर ४-५ हजारांवर येऊन ठेपला आहे तर दुसर्‍या टप्प्यातील मे महिन्यातील आंबा विक्रीचा दर उत्पन्नाच्यादृष्टीने शाश्‍वत मानला जात नाही. त्यामुळे घसरलेल्या दरामुळे आंबा बागायतदार पुरते हवालदिल झाले आहेत. उत्पन्नाची खर्‍या अर्थाने मदार असलेला पहिल्या टप्प्यातील हंगाम संपण्याच्या मार्गावर आणि दुसर्‍या टप्प्पात समाधानकारक उत्पन्न मिळण्याची आशा धूसर अशा स्थितीमध्ये फळबाजारामध्ये दरामध्ये पुन्हा एकदा तेजी येण्याची अपेक्षा आंबा बागायतदारांकडून केली जात आहे.

चौकट
दर आणखी घसरण्याचा अंदाज
मे महिन्यामध्ये मार्केटमध्ये विक्रीसाठी जाणारा आंब्याचे प्रमाण मार्च-एप्रिलच्या तुलनेमध्ये जास्त राहणार आहे. त्या वेळी वाढणार्‍या आंबा विक्रीमुळे दराचीही कमालीची घसरण होणार असून, तो दर पेटीमागे सरासरी दीड-दोन हजारांवर येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी बागायतदारांना आंबा कॅनिंगशीही स्पर्धा होणार आहे. त्यातून होणार्‍या आंबा विक्रीतून बागायतदारंना तुटपुंजे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

चौकट
थेट विक्रीवरही परिणाम
गेल्या काही वर्षामध्ये आंब्याची व्यापारी वा दलालांमार्फत विक्री करण्याऐवजी ग्राहकांशी संपर्क साधून थेट त्यांना विक्री करण्यावर बागायतदारांकडून भर दिला जात आहे. मात्र, फळमार्केटमध्ये आंब्याच्या पेटीचा दर घसरून निम्म्यावर आल्याने ग्राहकांकडूनही त्याहीपेक्षा कमी दराने आंब्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सद्यःस्थितीमध्ये थेट ग्राहकांना विक्री करणेही बागायतदारांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले आहे.

कोट
प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी आंबा हंगाम निम्म्यावर आला आहे. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून खर्चही भागवणे मुश्किल झाले आहे. अशा स्थितीमध्ये दरही निम्म्यावर आला तर आंबा हंगामासाठी केलेला खर्च कसा भागवायचा? बँकाकडून उचल केलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे?
- विशाल सरफरे, आंबा बागायतदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com