रत्नागिरी- अॅड. पटवर्धन

रत्नागिरी- अॅड. पटवर्धन

फोटो ओळी
-rat१६p३०.jpg-KOP२३L८९५१२ पुणे ः राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार करताना सहकार आयुक्त अनिल कवडे.

सहकार, पतसंस्था फेडरेशनच्या
समन्वयासाठी काम करा ः कवडे
रत्नागिरी, ता. १६ ः राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील पतसंस्थांना प्रदीर्घ अनुभवातून नेतृत्व द्या. आर्थिक शिस्त, स्पर्धात्मक युगातील आव्हान, नवीन तंत्रज्ञान या सर्वांचा सामना करत पतसंस्था जगत द्रुतगतीने पुढे जात असताना सहकार खाते व राज्य फेडरेशन यांच्यात समन्वय राखण्यासाठी काम करा, असे आवाहन पुणे येथील सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले. कवडे यांनी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे नूतन कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार केला. अर्थात् नावाचा ग्रंथ देऊन अॅड. पटवर्धन यांचा सत्कार त्यांनी केला. त्या प्रसंगी आयुक्त बोलत होते. या प्रसंगी सहकार खात्यातील अधिकारी शैलेश कोथमिरे, अप्पर आयुक्त ज्ञानदेव मुकणे, राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, उपनिबंधक सोबाळे, उपनिबंधक राम कुलकर्णी आदी उपस्थित होते. या वेळी आयुक्तांसोबत पतसंस्थांना लागू करावयाच्या अंशदान ठेव संरक्षणाची कार्यपद्धत याबाबत विस्तृत चर्चा झाली. सहकार खात्याने याबाबत अतिरिक्त आयुक्त कोथमिरे यांनी सादरीकरण केले. पतसंस्था चालकांना ही योजना माहित होण्याची गरज लक्षात घेऊन पतसंस्थांपर्यंत हा विषय पोहोचावा लागेल. पतसंस्था चालकांच्या मनात असलेल्या शंका या तपशीलवार सादरीकरणामुळे दूर होतील, असे ॲड. दीपक पटवर्धन यांनी बैठकीप्रसंगी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com