आमदार साळवींच्या कुटुंबीयांना एसीबीची नोटीस

आमदार साळवींच्या कुटुंबीयांना एसीबीची नोटीस

rat१६३८.txt

आमदार साळवींच्या कुटुंबीयांना एसीबीची नोटीस

रत्नागिरी, ता. १६ ः उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते आणि लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नोटीस पाठवली आहे. त्यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला एसीबीनं नोटीस पाठवली आहे. २० मार्चला त्यांना अलिबाग येथील कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे.
याबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले, कुटुंबीयांना नोटीस पाठवणं हे दुर्दैव आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आमदार झालेला मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिक आहे. संपूर्ण मतदार संघाला व जिल्ह्याला माझ्याबद्दल माहिती आहे. मी कुठल्याही चौकशीला घाबरत नाही. पहिल्या दिवसापासून चौकशीला सहकार्य करत आहे आणि यापुढंही करणार आहे. राजकीय हेतूने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टार्गेट केले जाते, असा आरोप त्यांनी या वेळी केला. पहिली नोटीस वैभव नाईक यांना, दुसरी नोटीस मला आणि तिसरी नोटीस नितीन देशमुख यांना आली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदारांनाच नोटिसा पाठवल्या जात आहेत, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com