वन, प्राण्यांच्या संरक्षणाचे धडे

वन, प्राण्यांच्या संरक्षणाचे धडे

89661
कुडाळ ः व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना वन-प्राण्यांचे महत्त्व अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना अमृत शिंदे आदी.

वन, प्राण्यांच्या संरक्षणाचे धडे

कुडाळ लॉ कॉलेजमध्ये प्रबोधन; वनाधिकाऱ्यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना वनांचे तसेच प्राण्यांचे महत्त्व समजावे व त्यांच्याप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, या हेतूने वनांची व प्राण्यांची काळजी याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे सामाजिक वनीकरण विभाग, कुडाळचे वनपाल सुनील सावंत, वेंगुर्ले येथील राऊंड फॉरेस्ट ऑफिसर सावळा कांबळे, नेरुर (कुडाळ) चे राऊंड फॉरेस्ट ऑफिसर धुळू कोळेकर, सर्पमित्र विजय शिंत्रे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी वनांची व प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन करताना कायद्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या तरतुदींची माहिती दिली. सुनील सावंत यांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या पर्यावरणाचे, पृथ्वीचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे, असे मत मांडले. सावळा कांबळे यांनी वन विभागाची रचना व कार्ये याबद्दल माहिती दिली. सर्पमित्र शिंत्रे यांनी सर्पांबाबत समाजामध्ये असलेले विविध गैरसमज सांगून ते कशा पद्धतीने चुकीचे आहेत, याबद्दल माहिती दिली. लॉ कॉलेजची विद्यार्थिनी तेजस्वी गोतल हिने मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे संस्थापक व्हिक्टर डान्टस यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्या शिल्पा मर्गज तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com