‘वकिलांना एकत्र घेऊन काम करू’

‘वकिलांना एकत्र घेऊन काम करू’

89678
ओरोस : पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांना शुभेच्छा देताना वकील बांधव व पदाधिकारी.

‘वकिलांना एकत्र घेऊन काम करू’

ॲड. नाईक; बार असोसिएशनने पदभार स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. परिमल नाईक, सचिव ॲड. यतीश खानोलकर, खजिनदार ॲड. गोविंद उर्फ अण्णा बांदेकर, उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुळकर, ॲड. नीलिमा सावंत-गावडे, सहसचिव ॲड. अक्षय चिंदरकर यांनी आज जिल्हा न्यायालय येथील वकील कक्षामध्ये पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. शामराव सावंत आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. नाईक यांनी जिल्ह्यातील सर्व वकिलांना एकत्र घेऊन काम करणार आहे. पूर्वीच्या कमिटीने उत्कृष्ट काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे काम केले जाईल. जिल्हा न्यायालय ओरोस येथे अॅडव्होकेट भवन उभारण्याचा मानस आहे. तसेच कुडाळ, सावंतवाडी, मालवण, देवगड या न्यायालयाच्या सुसज्ज इमारती उभारण्यासाठी प्रयत्न राहतील. अॅडव्होकेट भवनसाठी भूखंड घेऊन लवकरच बांधकामास सुरुवात करणार आहे. वकिलांसाठी वेल्फेअर अभियान राबविण्यात येईल, असे सांगितले. मावळते जिल्हाध्यक्ष अॅड. रावराणे यांनी तीन वर्षांत आमच्या माध्यमातून अनेक कामे झाली. जिल्ह्यातील ज्युनिअर व सीनियर वकिलांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात सर्वांनी साथ दिली. नव्या कार्यकरिणीला निश्चितच सहकार्य राहील, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com