वैभववाडीत रिक्षाचालकांशी पोलिस प्रशासनाचा संवाद

वैभववाडीत रिक्षाचालकांशी पोलिस प्रशासनाचा संवाद

टीपः swt१७२८.jpg मध्ये फोटो आहे.
वैभववाडी ः उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी रिक्षाचालकांशी संवाद साधला. यावेळी पोलिस निरीक्षक अमित यादव उपस्थित होते.

वैभववाडीत रिक्षाचालकांशी
पोलिस प्रशासनाचा संवाद
वैभववाडी, ता. १७ ः रिक्षा व्यवसाय करीत असताना आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकीतून काम करा. समाजाला सहकार्य होईल असे काम सर्वांकडून अपेक्षित आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी येथे व्यक्त केले.
येथील पोलिस ठाण्याला आज उपविभागीय पोलिस अधिकारी कांबळे यांनी भेट दिली. यावेळी पोलिस निरीक्षक अमित यादव उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यातच रिक्षाचालकांशी संवाद साधला. त्यांना जाणवणाऱ्या समस्यांची विचारपूस करून पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. कांबळे म्हणाले, ‘‘रिक्षा व्यवसाय करीत असताना चालकांचे अनेक गावांमध्ये ये-जा होत असते. त्यामुळे अनेकांशी संपर्कही होत असतो. रिक्षा चालवित असताना वाहतुकीचे काटेकोर नियम पाळावेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी भूमिका असावी. एखाद्या प्रसंगात किंवा आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक भान ठेवून मदत करणे गरजेचे आहे. पोलिसांशी संवाद ठेवला पाहिजे. पोलिसांबद्दल काही तक्रारी असतील तर त्याही सांगाव्यात.’’ यावेळी रिक्षाचालकांनी देखील कांबळे यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वाहतूक पोलिस रमेश नारनवर, रिक्षाचालक दत्ताराम रावराणे, दीपक भोसले, महेंद्र तांबे, बोभाटे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com