‘कृषी सेवा’ची निवडणूक बिनविरोध

‘कृषी सेवा’ची निवडणूक बिनविरोध

‘कृषी सेवा’ची निवडणूक बिनविरोध

एक जागा रिक्त; चारही प्रमुख पक्षांचे योगदान

ओरोस, ता. १७ : जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ लिमिटेड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. एकूण १८ संचालक निवडून द्यायचे होते. त्यातील सतरा जागांसाठी एकास एक अर्ज प्राप्त झाला आहे. तर एक जागा अर्जच न आल्याने रिक्त राहिली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या चारही पक्षाने मिळून ही निवडणूक बिनविरोध केली आहे. बिनविरोध झालेल्या संचालकांत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, बँक संचालक विठ्ठल देसाई, व्हिक्टर डांटस, प्रकाश मोर्ये आदींचा समावेश आहे.
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने २०२२-२३ ते २०२७-२८ या पाच वर्षासाठी नवीन संचालक निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी १३ मार्च पासून उमेदवारी अर्ज स्विकारण्यास प्रारंभ झाला होता. आज ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. २० मार्च रोजी दाखल अर्जांची छाननी होणार असून ५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. ६ ला निशाणी वाटप झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास १९ एप्रिलला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार होती. यासाठी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात श्रीकृष्ण मयेकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यासाठी एकूण ४० संस्था मतदार निश्चित झाले होते. एकूण १८ संचालक निवडून द्यायचे असून यामध्या आठ तालुका मतदार संघातून आठ संचालक, विविध कार्यकारी सेवा सोसायटीतून तीन संचालक, दोन महिला संचालक, प्रक्रिया व कृषी पूरक संस्था मतदार संघातून एक, ग्राहक संस्था मतदार संघातून एक, इतर मागास प्रवर्ग मधून एक, अनुसूचित जाती आणि जमाती मतदार संघातून एक, भटक्या व विमुक्त तसेच विशेष मागास प्रवर्गातील एक असे मतदार संघ निहाय संचालक निवडून द्यायचे आहेत
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यातील १७ जागांसाठी एकास एक अर्ज प्राप्त झाला आहे. भटक्या व विमुक्त तसेच विशेष मागास प्रवर्ग मतदार संघासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ही जागा रिक्त राहिली आहे. यात तालुका मतदार संघातील आठ जागांसाठी वेंगुर्ले मधून मनीष प्रकाश दळवी, देवगड मधून राजेंद्र शामराव शेटये, सावंतवाडी मधून प्रमोद रामचंद्र गावडे, मालवण मधून कृष्णा पांडुरंग चव्हाण, कुडाळ मधून प्रसाद गजानन रेगे, दोडामार्ग मधून संतोष दिनकर नानचे, कणकवली मधून विठ्ठल दत्ताराम देसाई, वैभववाडी मधून दिगंबर श्रीधर पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून रामानंद बुधाजी शिरोडकर, प्रकाश जगन्नाथ मोर्ये, व्हिक्टर फ्रान्सिस डांटस यांनी अर्ज दाखल केले आहेत.
---
इतर प्रक्रिया अशी
दोन महिला संचालक जागांसाठी वैशाली रावजी प्रभू, चित्रा मोहन कन्याळकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. इतर मागास प्रवर्ग जागेसाठी श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांनी तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून आनंद राजाराम ठाकूर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर भटक्या व विमुक्त जाती आणि विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून एकही अर्ज आलेला नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com