कणकवली भाजी मार्केट 
इमारत ताब्‍यात घ्यावी

कणकवली भाजी मार्केट इमारत ताब्‍यात घ्यावी

89856
कणकवली : तयार झालेली भाजी मार्केटची इमारत.


कणकवली भाजी मार्केट
इमारत ताब्‍यात घ्यावी

प्रथमेश तेली; विक्रेत्यांची व्यवस्था करावी

कणकवली, ता.१८ : शहरातील नगरपंचायतीच्या आरक्षण क्र.२६ मध्ये आम्‍ही भाजी मार्केटची इमारत बांधून पूर्ण केली आहे. ही इमारत नगरपंचायतीने आपल्‍या ताब्‍यात घ्यावी, जेणेकरून विस्थापित झालेल्‍या सर्व भाजी आणि फळ विक्रेत्‍यांची व्यवस्था होईल, अशी मागणी ग्‍लोबल असोसीएटचे प्रथमेश तेली यांनी केली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना तसे निवेदनही दिले.
श्री.तेली यांनी निवेदनात म्‍हटले आहे की, नगरपंचायतीच्या आरक्षण क्र.२६ मध्ये भाजी मार्केटसाठी आरक्षण होते. यात नगरपंचायतीच्या नियमानुसार आम्‍ही ग्‍लोबल असोसिएशट आणि स्थानिक जमीन मालकांच्यावतीने भाजी मार्केटसाठीची सुसज्‍ज इमारत बांधून पूर्ण केली आहे. या इमारतीसाठी पाच कोटींचा खर्च आला आहे; मात्र नगरपंचायतीशी झालेल्‍या करारानुसार ही इमारत आणि नगरपंचायतीला विनामोबदला हस्तांतरण करणार आहोत. तेलीआळी डीपी रोडवरील भाजी मार्केटमधील शहरातील सर्व भाजी विक्रेत्‍यांची व्यवस्था होणार आहे. त्‍यामुळे पालकमंत्र्यांनी ही इमारत ताब्‍यात घेण्याबाबतचे निर्देश नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना द्यावेत आणि शहरातील भाजी आणि फळ विक्रेत्‍यांची गैरसोय दूर करावी, अशीही मागणी प्रथमेश तेलींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com