कणकवलीत आता खेळाडू घडतील

कणकवलीत आता खेळाडू घडतील

89858
कणकवली : शहरातील क्रीडा सुविधा केंद्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमात बोलताना केंद्रीयमंत्री नारायण राणे. शेजारी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदी. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)


कणकवलीत आता खेळाडू घडतील

केंद्रीय मंत्री नारायण राणे; नगरपंचायतीच्या क्रीडा सुविधा केंद्राचे उद्‌घाटन

कणकवली, ता.१८ : कणकवलीत राजकारणी पुष्कळ आहेत; मात्र आता नगरपंचायतीने चांगल्‍या दर्जाचे क्रीडा सुविधा केंद्र तयार केले आहे. त्‍यामाध्यमातून आता चांगल्‍या दर्जाचे खेळाडू निश्‍चिपणे घडतील, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज येथे केले.
येथील नगरपंचायतीच्या क्रीडा सुविधा केंद्राच्या उद्‌घाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री श्री.राणे बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदी उपस्थित होते.
श्री.राणे म्‍हणाले, जी आश्‍वासने आम्‍ही पाच वर्षांपूर्वी दिली होती. त्‍यातील बहुतांश आश्‍वासने पूर्ण करण्यात यश मिळविले आहे. रिंगरोड लवकरच पूर्णत्‍वास जाईल. पर्यटनाच्या अनुषंगाने कृत्रिम धबधबाही उभा राहत आहेत. प्रत्‍येक प्रभागात चांगल्‍या दर्जाचे रस्ते तयार केले आहेत. तर अद्ययावत क्रीडा सुविधा केंद्रांचीही उभारणी झाली आहे. कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि टीमचे काम कौतुकास्पद आहे
दरम्‍यान, जानवली नदीकाठी कृत्रिम धबधबा उभारणीचे भूमिपूजन आमदार नीतेश राणे यांच्याहस्ते आणि केंद्रीय मंत्री राणे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, अबिद नाईक, बाबू गायकवाड, अण्णा कोदे, दादा कुडतडकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, विराज भोसले, नगरसेविका मेघा गांगण, उर्मी जाधव, मेघा सावंत, कविता राणे, अजय गांगण, किशोर राणे, महेश सावंत, संदीप नलावडे, अभय राणे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, मेहुल धुमाळे आदी उपस्थित होते.
--
राणे बंधूंमध्ये रंगला बॅडमिंटन खेळ
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार नीलेश राणे आणि त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी या नूतन स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन खेळाचे काही काळ प्रदर्शन केले. त्‍याला उपस्थित नागरिकांनी चांगली दाद दिली. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही बॅडमिंटन खेळाचा आनंद घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com