अखेर वनविभागाला सापडली लाकडाची चोरटी वाहतूक

अखेर वनविभागाला सापडली लाकडाची चोरटी वाहतूक

rat१८३२.txt

८९९२३
चिपळूण ः वनविभागाने खडपोली येथे पकडलेला लाकडाने भरलेला ट्रक.
-
लाकडाची चोरटी वाहतूक

वनविभागाची कारवाई ; ट्रकसह एकजण ताब्यात

चिपळूण, ता. १८ ः तालुक्यातील पूर्व विभागात सह्याद्रीच्या खोऱ्यात गेल्या काही दिवसापांसून जंगलतोडीवरून धुमशान सुरू आहे. नांदिवसे तसेच ओवळी येथील लाकूडतोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. अशातच खडपोली येथे जळावू लाकडाने भरलेला विनापरवाना ट्रक वनविभागाने पकडला. ट्रकमधील २९.७४४ घनमिटर लाकूड आणि ट्रक विभागाने जप्त केला आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये चिपळूण वनविभागाने ही कारवाई केली.
वनविभागाने दिलेली माहिती, तालुक्यातील पूर्व विभागातील नांदिवसे व ओवळी येथील जंगलतोडीचे फोटो आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच एकाने नांदिवसे येथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याची तक्रारही दिली होती. या तक्रारीनंतर नांदिवसे येथे १२ घनमिटरचा लाकूडसाठाबाबतची कारवाई करण्यात आली; मात्र त्याचवेळी ओवळी गावातही जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्याची ओरड सुरू होती. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ओवळी येथे पाहणी केली; मात्र त्यांना तेथे कोणत्याही प्रकारची जंगलतोड झाल्याचे दिसली नाही. त्यानंतर पुन्हा ओवळी विभागातच ३ किमीपर्यंत रस्ते काढून जंगलतोड सुरू असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शुक्रवारी सायंकाळी ओवळी येथून लाकडाने भरलेला ट्रक निघाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोध घेण्यास सुरवात झाली. खडपोली औद्योगिक वसाहतीत रात्री १०.३०च्या सुमारास ट्रक पकडला. या वाहनाची अधिक चौकशी केली असता तो विनापरवाना लाकूड वाहतूक करत असल्याचे उघड झाले. या ट्रकमध्ये २९.७४४ घनमिटर जळावू लाकूड आढळून आले. याप्रकरणी संशयित जितेंद्र शांताराम शिंदे (रा. ओवळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. लाकडासह ट्रक ताब्यात घेतला आहे. परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी कीर या अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com