ग्रंथालयीन प्रलंबित प्रश्न सोडवू

ग्रंथालयीन प्रलंबित प्रश्न सोडवू

90097
90098

ग्रंथालयीन प्रलंबित प्रश्न सोडवू

रणजित देसाई; गोवेरीत जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन

कुडाळ, ता. १९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय पातळीवरील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री, संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सहविचार सभा घेऊन प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी गोवेरी येथे ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात दिली. यावेळी जिल्ह्यातील ग्रंथालये तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांना आदर्श सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालय गोवेरी यांच्या सहकार्याने जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली गोवेरी वाचनालयाच्या सभागृहात झाले. अधिवेशनाचे उद्‍घाटन कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते झाले. अधिवेशनाच्या प्रारंभी गोवेरी गावातील घोलकरवाडी, सुंदरवाडी ते सत्पुरुष मंदिर येथून सजविलेली ग्रंथदिंडी ढोलताशांच्या गजरात कार्यक्रमस्थळी आणली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एस. पी. सामंत, गोवेरी सरपंच दशरथ परब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, ‘कोमसाप’चे पदाधिकारी धाकू तानावडे, ऋतुजा केळकर, महेश बोवलेकर, विठ्ठल कदम, जयप्रकाश नार्वेकर, महेश गावडे, राजन पांचाळ, संजय शिंदे, नाथा मडवळ, अनुष्का शिवडावकर, प्रवीण भोगटे, विजय पालघर, नंदकिशोर गावडे, स्वरा गावडे, सतीश गावडे, उमेश गावडे, सुदाम गावडे, अंकुश गावडे, गोविंद गावडे, नेरुर गोवेरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खानोलकर, आप्पा भोगटे, गणेश शिरसाट, व्ही. के. परब, सत्यवान हरमरकर, सचिन परुळकर, डॉ. अमोघ चुबे, प्रसाद दळवी आदी उपस्थित होते

देसाई पुढे म्हणाले, ‘‘ग्रंथालयांचे अनेक प्रश्न, समस्या केवळ बैठकीतून सुटणार नाहीत किंवा निवेदन देऊनही यावर तोडगा निघणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मंत्री, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून सहविचार सभा होऊन या सभेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईन. आज कमी मानधनात ग्रंथालय कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू.’’ मस्के यांनी ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. शासनाचे अनुदान मार्च महिन्यातच मिळाले पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. तसेच ग्रंथालय प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगून शालेय मंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी भ्रमणध्वनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याचे सांगितले. वैद्य यांनी सिंधुदुर्गातील ३५० ग्रंथालय कर्मचाऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे एवढा पगारसुद्धा मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. ‘गाव तिथे वाचनालय’, अशा घोषणा करत शासन दिशाभूल करत आहे. ग्रंथालय वृद्धिंगत करायचे नसेल तर घोषणा कशासाठी, असा सवालही उपस्थित करून त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा सहकार्यवाह महेश बोवलेकर यांनी प्रास्ताविक केले. महेश गावडे, राजन पांचाळ यांनी सूत्रसंचालन केले. सतीश गावडे यांनी आभार मानले.
.................
चौकट
ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पुरस्कार
यावेळी आदर्श संस्था पुरस्कार श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, माणगाव (ता. कुडाळ), श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (ता. वेंगुर्ले) यांना, आदर्श व्यक्ती पुरस्कार रमेश राऊळ (कार्यवाह, श्रीदेवी सातेरी वाचनालय, वेतोरे), देवदत्त चुबे (अध्यक्ष, श्री देव जगन्नाथ वाचनालय ग्रंथसंग्रहालय केरवडे तर्फ माणगाव), आदर्श सेवक पुरस्कार दीपा सुकी (ग्रंथपाल, श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली), महेंद्र पटेल (ग्रंथपाल, श्रीराम वाचन मंदिर व क्रीडाभुवन, सावंतवाडी) यांना गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com