दहीवलीतील खरात कुटुंबाचे घर पाच वर्षानी प्रकाशमान

दहीवलीतील खरात कुटुंबाचे घर पाच वर्षानी प्रकाशमान

-rat१९p३१.jpg-
९०१००
सावर्डे ः कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन आभार व्यक्त करताना सौ. खरात. शेजारी अशोक काजरोळकर, शरद परीट, कमलेश घाडगे.
-

दहीवलीतील खरात कुटुंबाचे घर पाच वर्षानी प्रकाशमान

अशोक कजरोळकर यांचे विशेष प्रयत्न ; मोफत वीज व्यवस्था

संदीप घाग/सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २० ः चिपळूण तालुक्यातील कामथे येथून स्थलांतरित होऊन दहीवली गावात मुकनाक वाडीजवळ डोंगरपायथ्याशी असलेल्या जंगलात उपजीविकेसाठी आलेल्या यशवंत खरात या सर्वसामान्य कुटुंबीयांची पाच वर्षानंतर अंधारातून मुक्तता झाली आहे. चिपळूण महावितरणचे प्रशासकीय अधिकारी अशोक कजरोळकर यांच्या प्रयत्नाने एक किमी अंतरावरून तीन लाख रुपये महावितरणने खर्च करून खरात यांना मोफत वीज जोडणी दिली.
खरात कुटुंबीयांना महावितरण वीज कंपनीच्या चिपळूण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अशोक काजरोळकर, सावर्डे उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता शरद परीट आणि सहाय्यक अभियंता कमलेश घाडगे यांनी विशेष सहकार्य केले.
दहिवली मुकनाकवाडी येथे डोंगरपायथ्याशी कुटुंबासह स्थलांतरित झालेले खरात गेली पाच वर्ष मूलभूत सुविधा रस्ता, वीज व पाणी यापासून वंचित आहेत. गेल्या पाच वर्षापासून दूध विक्री करून कुटुंबाचा चरितार्थ भागवत एक एक दिवस ढकलत आहेत. त्यांच्या घराला वीज पुरवठा घेण्यासाठी जवळपास एक किमीपर्यंत लाईन नाही. एका कुटुंबासाठी १० ते १५ खांब टाकून जंगलातून वीज मिळणार नाही असे समजून श्री. खरात यांनी वीज मिळण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
परंतू नियतीचा खेळ अवघडच. विनातक्रार संसाराचा गाडा हाकणारे यशवंत खरात यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला आणि त्यांचे चालणे -फिरणे बंद झाले. खरात यांच्या उपचारासाठी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय पाटील व डॉ. विजय पाटील उपचारासाठी रात्री-अपरात्री जात होते. खरात यांचे जंगलातील वास्तव्य, अंधारातील भयाण वास्तव याची हकीगत डॉक्टरांनी महावितरणचे अशोक काजरोळकर यांना सांगितली. त्यावर काजरोळकर यांनी खरात यांचा वीज मागणीसाठी अर्ज घेऊन सावर्डे शाखाधिकारी कमलेश घाटगे यांना प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यास सांगितले. कमलेश गाडगे यांनी जंगलातून सर्व्हे करून सदरचे प्रकरण मंजुरीसाठी सादर केले. कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी त्वरित मंजुरी देऊन ठेकेदाराची नेमणूक केली. जागा मालकांच्या सहकार्याने येथील महावितरणचे ठेकेदार प्रतीक कोल्हापुरे यांनी काम पूर्ण केले. १८ मार्चला कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी श्री. खरात यांच्या घरी भेट देऊन वीज पुरवठा चालू केला. श्री. खरात यांच्या पत्नी यांनी महावितरणचे आभार व्यक्त करून कैलास लवेकर यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. घर तिथे वीज देण्याचे धोरण महावितरणचे असल्याने विजेविना असणाऱ्या नवीन ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कैलास लवेकर यांनी केले आहे.
---
ससससस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com