कविता, गाणी, विडंबनातून शासनाला गाऱ्हाणे

कविता, गाणी, विडंबनातून शासनाला गाऱ्हाणे

rat१९१९.txt


-rat१९p३३.jpg-
९०१०२
मंडणगड: जुनी पेन्शन लागू करण्याचे मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेले विविध विभागातील शासकीय कर्मचारी.
-

कविता, गाणी, विडंबनातून शासनाला गाऱ्हाणे

मंडणगड तालुका ; एकच मिशन जुनी पेन्शन

मंडणगड, ता. २० ः जुन्या पेन्शनसह विविध दहा मागण्याकरिता पुकारण्यात आलेल्या संपास मंडणगड तालुक्यातून सहाव्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. संपात सहभाग कर्मचारी कविता, गाणी, विंडबन यांच्या माध्यमातून जुन्या पेन्शनबाबत सरकाराला गाऱ्हाणे घालत आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकारे आंदोलन करीत आहेत.
एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संघटनांनी तहसील कार्यालयाचे आवारात तंबू ठोकून बेमुदत संप पुकारला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत आंदोलनातील सहभागी कर्मचारी आंदोलनाचे ठिकाणी जमा होत असून राष्ट्रगीताने दिवसाची सुरवात करण्यात येत आहेत. संपकरी कर्माचाऱ्यांनी पंचायत समिती ते तहसील कार्यालय असा शहर परिसरातून घोषणा देत मोर्चा काढला. आपल्या मागण्या संदर्भात जागृती करताना विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. संपामध्ये पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बांधकाम विभाग, तालुका आरोग्य विभाग, शिक्षक, ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.
-
राजकीय पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा
आंदोलनाच्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गोवळे, उपतालुकाप्रमुख रघुनाथ पोस्टुरे यांनी संपाला पाठिंबा दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com