चिपळूण-जूनी पेन्शनला आमदार निकम यांचा पाठिंबा

चिपळूण-जूनी पेन्शनला आमदार निकम यांचा पाठिंबा

फोटो ओळी
-rat19p35.jpg- KOP23L90132
चिपळूण ः आमदार शेखर निकम यांनी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्यांची भेट घेवून आपला पाठिंबा दर्शवला.
----------------

जुनी पेन्शन योजना लागू करायला हवी
आमदार निकम ; चिपळुणात संपकरी कर्मचाऱ्यांना दिला पाठिंबा
चिपळूण, ता. १९ ः राज्यात कोणाचेही सरकार असू दे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे, असे सांगत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार शेखर निकम यांनी पाठिंबा दिला.
येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आमदार निकम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘कर्मचारी त्यांचा हक्क मागत आहेत. कारण उतारवयात पेन्शन हेच उदरनिर्वाहाचे साधन असणार आहे. राज्यात महागाई वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन खर्चही वाढत आहे. कर्मचाऱ्यांवर पेन्शनसाठी उपोषण करण्याची वेळ आली हे चुकीचे आहे. जुनी पेन्शन लागू झाल्यानंतर सरकारचा खर्च वाढणार असेल तर सरकारचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारी उद्योग वाढले पाहिजे. सामान्य नागरिकांवर कर लादून उत्पन्न वाढवता कामा नये. उद्योगपती एका रात्रीत हजारो कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून निघून जातात. अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com