मडुरा सोसायटी भाजपकडे

मडुरा सोसायटी भाजपकडे

90246
मडुरा ः सोसायटी निवडणुकीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना जिल्हा प्रवक्ते संजू परब. शेजारी बाळू गावडे, दिलीप परब आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मडुरा सोसायटी भाजपकडे

पंचवार्षिक निवडणूक; १२ पैकी ११ उमेदवार विजयी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला. एकूण १२ पैकी ११ उमेदवार विजयी झाले. तीन उमेदवारांना समान मते पडल्याने काढलेल्या ईश्वर चिठ्ठीत माजी चेअरमन संतोष परब विजयी झाले. या विजयाने भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचे नेतृत्व सिद्ध झाले.
मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया काल (ता. १९) झाली. एकूण ९१९ मतदारांपैकी ३७९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. १३ संचालक संख्या असलेल्या सोसायटीत भाजप पुरस्कृत पॅनेलचे अनुसूचित जाती जमाती मतदार संघाचे उमेदवार देवू कोळापटे हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे १२ संचालक जागांसाठी निवडणूक झाली. त्यासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी उशिरा मतमोजणी झाली.
भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनलचे ज्ञानेश परब (१९१ मते), सुरेश गावडे (२०१), आत्माराम गावडे (१८४), उदय देऊलकर (२०१), दत्ताराम परब (१७०), सुकाजी मोरजकर (१७०), शामराव म्हाडगुत (१९४), जयराम गवंडे (१९४), अर्चना परब (१९६), सुविधा धुरी (१७६), पुंडलिक जाधव (१९७) विजयी झाले.
---
चिठ्ठीद्वारे निवडीतून परब विजयी
उमेदवार लाडू परब, संतोष परब व उल्हास परब यांना समान १६६ मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली. गौरवी सावळ हिने काढलेल्या चिठ्ठीत संतोष परब यांचा विजय झाला. सर्व विजयी उमेदवारांचे भाजप प्रवक्ते परब, सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, दिलीप परब यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com