प्रशासक विजय चव्हाणांची 
कुडाळात संपकऱ्यांशी चर्चा

प्रशासक विजय चव्हाणांची कुडाळात संपकऱ्यांशी चर्चा

90245
कुडाळ ः कर्मचारी आंदोलनस्थळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी भेट दिली.

प्रशासक विजय चव्हाणांची
कुडाळात संपकऱ्यांशी चर्चा
कुडाळ, ता. २० ः प्रशासन संवेदनशील आहे. संपकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोचल्या असून निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास प्रतिपादन पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी संपात बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटीप्रसंगी व्यक्त केला.
येथील पंचायत समितीचा लेखा, आरोग्य, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, लिपिक, वाहन चालक, परिचर, शाखा अभियंता, कृषी विभागाच्या, कर्मचाऱ्यांनी मूलभूत मागण्यांसाठी गेले सात दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनस्थळी पंचायत समितीचे प्रशासक गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी चव्हाण यांनी तुमच्या भावनांची शासनाला कदर आहे. कर्मचारी संपामुळे निश्चितच प्रशासन संवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोचल्या असून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ''कर्मचारी संघटनेचा विजय असो'', ''एकच मिशन जुनी पेन्शन'', ''हम सब एक है'' आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. ग्रामसेवक युनियनचे सचिव संतोष पालव, लेखा विभागाचे राजू खेत्री यांनी प्रशासक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com