राजापूर-मच्छीमारांना डिझेल परतावा एप्रिलमध्ये देणार

राजापूर-मच्छीमारांना डिझेल परतावा एप्रिलमध्ये देणार

मच्छीमारांना डिझेल परतावा एप्रिलमध्ये देणार
सुधीर मुनगंटीवार ; समस्या सोडविण्यासाठी घेणार बैठक
राजापूर, ता. २० ः सातत्याने येणारी नैसर्गिक वादळे आणि कोविड स्थितीचा जोरदार फटका बसून मच्छीमार बांधव विशेषतः कोकणातील मच्छीमार आर्थिदृष्ट्या मेटाकुटीस आलेले आहेत. त्यांच्या समस्येला आमदार राजन साळवी यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे अधिवेशनामध्ये वाचा फोडली. मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नौकाधारक मच्छीमारांना मिळणारा डिझेल परतावा विशेष बाब म्हणून एप्रिल महिन्यामध्ये वितरित करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व आमदारांसमवेत पुढील महिन्यामध्ये बैठक घेणार असल्याचे सांगितले.
आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या मच्छीमारांना शेतकर्‍यांप्रमाणे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी श्री. साळवी यांनी केली. किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत घेण्यात आलेली छोट्या मुदतीची कर्ज व व्याज माफ होणार का? कोकणातील नौकाधारक मच्छीमारांचा प्रलंबित असलेला कोट्यावधीचा डिझेल परतावा कधी मिळणार? डिझेल साठविण्यासाठी डिझेल डेपोची आवश्यकता असून त्याप्रमाणे निर्मिती केली जाणार का असा सवाल श्री.साळवी यांनी उपस्थित केला आहे.
तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री श्री. मुनगुंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामध्ये नौकाधारक मच्छीमारांना मिळणारा डिझेल परतावा विशेषबाब म्हणून एप्रिलमध्ये वितरित केला जाईल, असे सांगितले. त्याचवेळी भविष्यामध्ये डिझेल परतावा नियमित कसा केला जाईल याबाबत उपाययोजना केला जाईल असेही स्पष्ट केले. मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व आमदारांसमवेत पुढील महिन्यात सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितल्याचे आमदार श्री. साळवी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com