संपकरी कर्मचाऱ्यांचा ‘थाळीनाद’

संपकरी कर्मचाऱ्यांचा ‘थाळीनाद’

90284
सिंधुदुर्गनगरी ः संपकरी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळीनाद’ आंदोलन केले.

संपकऱ्यांनी गायनातून
वेधले सरकारचे लक्ष
सिंधुदुर्गनगरी, ता. २० ः जुनी पेन्शन लागू करा, या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळीनाद’ आंदोलन करून तसेच गीत गायन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दुपारी सरकारने काही मागण्या मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला.
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर १४ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तसेच गेले सात दिवस धरणे आंदोलन करून कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखविली. या धरणे आंदोलनात सर्व संघटनांनी उस्फूर्त सहभाग घेतला. यावेळी विविध संघटनांच्या माध्यमातून गीते सादर करून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बेमुदत संपाचा आजचा सातवा दिवस असून आजही कर्मचाऱ्यांमध्ये एकजूट आणि तोच उत्साह दिसून आला. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ‘थाळीनाद’ आंदोलन करून परिसर दणाणून सोडला. तर मृदंग, टाळ आणि थाळ्या वाजवून विविध गीते सादर करून प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com