केळकर महाविद्यालय उपविजेता

केळकर महाविद्यालय उपविजेता

90335
कुडाळ ः येथील अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता संघ.


केळकर महाविद्यालय उपविजेता

शिक्षकेतरांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये बाजी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी (सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित) टेनिस चेंडू क्रिकेट स्पर्धेत येथील स. ह. केळकर महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ उपविजेता ठरला. संघाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
ही क्रिकेट स्पर्धा कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आली. स्पर्धेमध्ये वेंगुर्ले येथील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कणकवली महाविद्यालय, मालवण स. का. पाटील महाविद्यालय, सावंतवाडीतील एस.पी.के. महाविद्यालय, वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, फोंडाघाट वाणिज्य महाविद्यालय, येथील स. ह. केळकर महाविद्यालय, दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालय, पानवळ बांदा गोगटे वाळके महाविद्यालय आदी जिल्ह्यातील एकूण दहा संघ सहभागी झाले. अंतिम सामना कणकवली महाविद्यालय आणि देवगड महाविद्यालय यांच्यामध्ये झाला. यामध्ये कणकवली संघ विजेता, तर देवगड उपविजेता ठरला. उपविजेत्या संघाला रोख ३००० रुपये आणि चषक देण्यात आला. पंकज जाधव यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले. या सर्व कर्मचार्‍यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com