कणकवली :निविदा

कणकवली :निविदा

कोकिसरे ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवली ः वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विकास कामांची निविदा जाहीर केली आहे. मान्यता प्राप्त ठेकेदार, मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना ही निविदा भरता येणार आहे. यामध्ये कोकिसरे खांबळेवाडी नवरेकरवाडी रस्त्यांचे गटार बांधणे तीन लाख ७ हजार १०२ रुपये मंजूर आहेत. तसेच नेवरेकर वाडीतील पथदीप सुविधा करणेसाठी चार लाख ८८ हजार ९२२ रुपये मंजूर केले आहेत. या कामाची निविदा २७ मार्च पर्यंत बंद लिपाफ्यामध्ये कागदपत्रासह कार्यालयीन वेळ ग्रामपंचायत कार्यालय कोकिसरे येथे सादर करावी. निविदा आणि अटी शर्तीची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. निविदा उघडण्याची तारीख २८ मार्च सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय कोकिसरे येथे केली जाणार आहे. असे सरपंच ग्रामपंचायत कोकिसरे यांनी कळविले आहे.

भुईबावडा ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवली ः वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व नव नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासासाठी निवेदन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भुईबावडा बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण करणे दोन लाख ९९ हजार ९४७ रुपये आणि बौद्धवाडी येथील पथदिप बसवणे ५५ हजार ३६० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मान्यता प्राप्त ठेकेदारांना २७ मार्चपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत निविदा ग्रामपंचायत मध्ये सादर करता येणार आहे. ही निविदा २८ मार्चला ग्रामपंचायत कार्यालयात खुली करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तसेच अंदाजपत्रक अटी व शर्ती ग्रामपंचायत कार्यालयात पाहावयास मिळेल असे सरपंच भुईबावडा यांनी कळवले आहे.

कलमठ ग्रामपंचायतची विकास निविदा जाहीर
कणकवली ः तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने नोंदणीकृत ठेकेदारांसाठी कोऱ्या निविदा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. या अंतर्गत कलमठ लांजेवाडी येथील आचरारोड ते बाबू नारकर यांचे घरापर्यंत जाणारी पायवाट करणे एक लाख १९ हजार ९९९, कलमठ सिद्धार्थनगर कॉलनी स्तूप बसविणे एक लाख रुपये, सिद्धार्थ कॉलिनी स्तूप जवळ सुशोभीकरण एक लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच सिद्धार्थ कॉलनी कांबळे सर यांच्या घरापर्यंत पायवाट करण्यासाठी ५० हजार तर सिद्धार्थ कॉलनी येथे स्टेज मंडप बांधण्यासाठी ८५ हजार ८१२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मान्यता प्राप्त ठेकेदारांना ३१ मार्च पर्यंत सीलबंद लकोट्यात निविदा सादर करता येणार आहे. अटी व शर्ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस फलकावरती लावण्यात आलेले आहेत, असे सरपंच कलमठ यांनी जाहीर निविदेत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com