कुडाळात आजपासून विविध कार्यक्रम

कुडाळात आजपासून विविध कार्यक्रम

90447
श्री देव कुडाळेश्वर

कुडाळात आजपासून विविध कार्यक्रम

गुढीपाडवा, रामनवमी सोहळा; दशावतारी नाट्यप्रयोग, ऑर्केस्ट्राचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः श्रीरामनवमी महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा व श्रीरामनवमीनिमित्त २२ मार्च ते १ एप्रिल दरम्यान ११ दिवस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या उत्सवात नित्य कार्यक्रमांमध्ये सकाळी ८ ते १२ श्रींच्या पाषाणमूर्तीवर लघुरुद्राभिषेक, सायंकाळी सातला आरती व मंत्रघोष, पुराण वाचन, रात्री दहाला श्रींची पालखी मिरवणूक, श्रींच्या उत्सव मूर्तीचे आगमन, कीर्तन व आरती, विशेष कार्यक्रम होणार आहेत. उद्या (ता. २२) गुढीपाडवा उत्सवानिमित्त दुपारी बाराला गुढीरोहण, पूजन, नववर्षफलवाचन, दुपारी एकला श्रींची महापूजा, सायंकाळी साडेचारला वालावलकर दशावतार नाट्यमंडळींचे पौराणिक नाटक ‘बालभुवनेश्वर’, २३ ला सायंकाळी साडेचारला नवोदित बालदशावतार नाट्यमंडळ, माड्याचीवाडी यांचे पौराणिक नाटक ‘वीरासुर वध’, २४ ला सायंकाळी पाचला बक्षीस वितरण, श्री देव कुडाळेश्वर महिला मंडळ आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विनोदी नाटिका ‘श्रीवल्ली’, २५ ला सायंकाळी साडेचारला अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा विठ्ठल भक्तिवर आधारीत नाट्यप्रयोग ‘कूर्मदासाची वारी’, २६ ला सायंकाळी साडेचारला चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचे पौराणिक नाटक ‘शिवशक्ती वेताळ’, २७ ला सायंकाळी पाचला सिद्धाई डान्स अॅकॅडमी, कुडाळ संचालिका कविता राऊळ आणि शिष्या व श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे महेश सावंत यांचे संयुक्त विद्यमाने गायन, वादन व शास्त्रीय भरतनाट्यम, २८ ला सायंकाळी साडेचारला जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, आरोस-दांडेली यांचे पौराणिक नाटक ‘शिवमहाकाल’, २९ ला सायंकाळी साडेचारला श्री देव कुडाळेश्वर प्रस्तुत संकल्प क्रिएशन डॉन्स अॅकॅडमीचा संगीत, नृत्य, नाट्यमय कार्यक्रम, ३० ला सकाळी सातला धार्मिक कार्यक्रम, दुपारी सव्वाबाराला श्रीरामजन्म व प्रसाद (सुंठवडा), श्रींची पालखी मिरवणूक, सायंकाळी साडेचारला चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ (देवेंद्र नाईक प्रस्तुत) चेंदवण यांचे पौराणिक नाटक ‘भक्ती महिमा’, रात्री नऊला श्रींची पालखी मिरवणूक, रात्री दहाला श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळाचे विनोदी नाटक ‘आगासलो तो मागासलो’ (लेखक व दिग्दर्शक संतोष घाटकर), साडेबाराला पार्सेकर दशावतार नाट्यमंडळीचे पौराणिक नाटक ‘पुत्र नवसाचा’, ३१ ला सायंकाळी साडेचारला कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर (भाई कलिंगण) यांचे पौराणिक नाटक ‘अर्धशिरा’, १ एप्रिलला सकाळी साडेदहाला श्रीरामराज्याभिषेक, दुपारी तीनला पट्टाभिषेक, नवग्रहशांती, श्री हनुमान प्रतिमतेचे पूजन, सायंकाळी तीनला पालखी मिरवणूक, साडेचारला पार्सेकर दशावतारी नाट्यमंडळीचे पौराणिक नाटक ‘स्पर्शमणी’, रात्री पावणेनऊला श्रींची पालखी मिरवणूक, दहाला कीर्तन-लळीत (विश्वनाथ उर्फ भाऊ नाईक, वेतोरे), अकराला आदित्य प्रॉडक्शन, कोल्हापूर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा ‘जल्लोष’ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com