गुढीपाडव्यानिमित्त आज 
मालवण येथे शोभायात्रा

गुढीपाडव्यानिमित्त आज मालवण येथे शोभायात्रा

गुढीपाडव्यानिमित्त आज
मालवण येथे शोभायात्रा
मालवण, ता. २१ : गुढीपाडवा नववर्षनिमित्ताने मालवणवासीयांच्यावतीने उद्या (ता. २२) सायंकाळी साडेचारला हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी शोभायात्रेत बार्देश गोवा येथील पारंपरिक सादरीकरणातील रोंबाट नृत्य खास आकर्षण असणार आहे. ढोलताशांचा गजर, घोडे, चित्ररथ, विविध वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषेतील मुले व शेकडो नागरिकांच्या सहभागातून शोभायात्रा भव्य स्वरुपात काढण्यात येणार आहे. मालवण भरड, बाजारपेठ मार्गे पिंपळपार अशी नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. गुढीपाडवा हा हिंदू संस्कृतीमधील चैत्रातील एक शुभ मुहूर्त. याच मुहूर्तावर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. शकांनी हूणांचा पराभव केला आणि याच मुहूर्तावर प्रभू रामचंद्र वनवास संपवून स्वगृही परतले. चैत्रातील पालवीसुद्धा याच मुहूर्तावर निसर्गाला नवचेतना देत असते. याच अध्यात्मिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीवर आपल्या नववर्षाची स्थापना झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मालवणवासीयांनी भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन केले आहे. शोभायात्रेत वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा बालवाडी ते तिसरी व चौथी ते सातवी अशा दोन गटात असणार आहे. दोन्ही गटात प्रथम तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना पारितोषिक देण्यात येईल. मालवणवासीयांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com