चिपळूणात 25 मार्चला रंगणार सुरमयी शाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूणात 25 मार्चला रंगणार सुरमयी शाम
चिपळूणात 25 मार्चला रंगणार सुरमयी शाम

चिपळूणात 25 मार्चला रंगणार सुरमयी शाम

sakal_logo
By

चिपळूणात शनिवारी रंगणार सुरमयी शाम

चिपळूण, ता. 21 ः येथील स्वरसंगम गायक परिवार चिपळूणतर्फे शनिवारी (ता 25) सुरमयी शाम कराओके संगितावर आधारीत सुरेल सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने गायन क्षेत्रातील हौशी सुनील पवार आणि अरविंद पवार या दोघांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे. याबाबत माहिती देताना सुनील पवार म्हणाले, हौशी व नवोदित गायक - गायिकांचे नीतीमुल्ये जपणारे व्यासपीठ म्हणून स्वरसंगम गायक परिवार चिपळूणकडे पाहिले जाते. गायनाचा छंद जोपासणाऱ्या नवोदित कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी स्वरसंगम गायक परिवाराने उपलब्ध करून दिली आहे. येथील बांदल हायस्कूलच्या सभागृहात 25 मार्च रोजी सांयकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे. कराओकेच्या माध्यमातून अनेक तरूण - तरूणी हौशी कलाकार आपली गायनाची आवड जोपासतात. मात्र त्यांनी आपली कला जाहीररित्या सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेवून स्वरसंगम गायक परिवार चिपळूणने सुरमयी शाम या बॅनरखाली व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे. दोन तासाच्या या कार्यक्रमात 11 जण गायनाची कला सादर करणार आहेत. यातील अनेक जण किशोर कुमारची गाणी म्हणणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या रसिकांना जर दिव्यांग व्यक्तींना मदत करायची इच्छा असेल तर चिपळूणातील दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत करण्याची संधी या कार्यक्रमात उपलब्ध करून दिली जाणार आहे.