गुढीपाडवा स्वागतयात्रेने रत्नागिरी दुमदुमली

गुढीपाडवा स्वागतयात्रेने रत्नागिरी दुमदुमली

गुढीपाडवा स्वागतयात्रा
rat२२p१४.jpg-
९०७०८
रत्नागिरी : येथे बुधवारी आयोजित स्वागतयात्रेत पालखी नाचवताना लहान मुले. दुसऱ्या छायाचित्रात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण. तिसऱ्या छायाचित्रात जाकीमिऱ्या मच्छीमार सोसायटीने केलेला मच्छीमारीचा देखावा. चौथ्या छायाचित्रात नृत्य सादर करताना महिला.
rat२२p१५.jpg-
९०७०९
रत्नागिरी : स्वागतयात्रेत श्री भैरीबुवाची पालखी नेताना पालकमंत्री उदय सामंत, शेजारी मनोहर जोशी पहिल्या छायाचित्रात. दुसऱ्या छायाचित्रात बाजीप्रभू देशपांडे व बांदल मावळ्यांचा पावनखिंड देखावा. तिसऱ्या छायाचित्रात शिवतांडव व माता पार्वती.
(सर्व छायाचित्रे- कांचन मालगुंडकर, रत्नागिरी)

गुढीपाडवा स्वागतयात्रेने रत्नागिरी दुमदुमली

चित्ररथांची वाढली संख्या ; अवघा परिसर भगवामय

रत्नागिरी, ता. २२ : हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत यंदा चित्ररथांची व समाजबांधवांची संख्या वाढली. ग्रामदैवत श्री भैरी मंदिर ते मारुती मंदिर हा सारा परिसर भगवेमय आणि गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेने अवघी रत्नागिरी दुमदुमली. ग्राममंदिर ते समाजमंदिर या मार्गावर निघणाऱ्या यात्रेचे नियोजनबद्ध कामकाज असल्याने स्वागतयात्रा शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. स्वागतयात्रेत यंदा १२ हजारांहून अधिक हिंदू बंध-भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. शिवतांडव अथवा अघोर लिलादर्शन, लाठीकाठी, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आणि शिवकालीन तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर झाली.

ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून स्वागतयात्रेस प्रारंभ झाला. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित होते. शहराच्या विविध मार्गांवरून रथयात्रा येत असताना अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागतासाठी रांगोळ्या, पताकांनी वातावरण भगवेमय झाले होते. सकाळी ९ वाजता मारुती मंदिर येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वागतयात्रा सुरू झाली. स्वागतयात्रेच्या मार्गावर सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्याने वातावरण भगवेमय झाले होते. नाक्यानाक्यावर चित्ररथांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदा अनेक संस्थांनी प्रथमच स्वागतयात्रेत भाग घेतला होता.
स्वागतयात्रेमध्ये प्रभू श्रीराम, कृष्ण यांचे देखावे सादर केले. तसेच भजन पथक, ढोल-ताशे पथक, मच्छीमारीसंदर्भात देखावा, देवरुख ओझरेखुर्द येथील गंगावेस तालीमचे शिवकालीन खेळ लक्ष्यवेधी ठरले. तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने प्रथमच भाग घेत उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश दिला.
ग्रामदैवत भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, बाबा परुळेकर, संतोष पावरी, राजन जोशी अॅड. विलास पाटणे, बाबू म्हाप, राहुल पंडित यांच्यासमवेत हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारुती मंदिर येथे सचिन वहाळकर, कोमल सिंग, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, मुकुंद जोशी, राकेश नलावडे हर्ष दुडे शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

शिवतांडवाचा थरार
मारुती मंदिर येथून २५ हून अधिक चित्ररथ, संस्था सहभागी झाल्या. मारुती मंदिर येथून श्री मरुधर विष्णू समाज व राजस्थान क्षत्रिय समाजाचा शंभो महादेवाचा रथ सहभागी झाला. यामध्ये दिल्लीतील कलापथकाने शिवतांडव, शंभू महादेव, पार्वती, आणि यक्ष भूत अघोरी नागा साधू, महाकाली अशी विभिन्न रूप प्रदर्शन पाहायला हजारो हिंदूची गर्दी झाली. आगीवर रॉकेल फुंकणे, स्मशानातील प्रसंग, अघोरी नागा साधूंनी थरारक शिवतांडव सादर केले आणि सर्वांनी शिवशंभोचा गजर केला.

स्वच्छता अभियानसुद्धा
स्वागतयात्रेसाठी पाणी, सरबत आणि ताकाची व्यवस्था विविध मंडळांनी केली होती. त्यामुळे या परिसरात कुठेही प्लास्टिक बाटल्या, पाण्याचे ग्लास किंवा अन्य काही अस्वच्छता होऊ नये म्हणून खालची आळी मित्रमंडळाचे कार्यकर्ते कार्यरत होते. त्यामुळे कोठेही कचरा झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com