नववर्षानिमित्त जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थेतर्फे शोभा यात्रा

नववर्षानिमित्त जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थेतर्फे शोभा यात्रा

- rat२२p१९.jpg-
९०७५१
रत्नागिरी ः शोभायात्रेत हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले

जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थेतर्फे शोभा यात्रा

हिंदू संस्कृतीचे, लोककलांचे दर्शन ः श्रीराम मंदिरात सांगता

रत्नागिरी, ता. २२ : हिंदू नववर्षानिमित्त जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे आज (ता. २२) रत्नागिरीत दरवर्षीप्रमाणे शोभा यात्रा काढण्यात आली. यामध्ये हिंदू संस्कृतीचे, लोककलांचे दर्शन घडवण्यात आले. हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येतो.
रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर येथे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून भाविक एकत्र जमले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन मिरवणूकीचा आरंभ झाला. वाद्यांच्या गजरात हिंदू धर्माचा जयघोष करीत शोभायात्रा सुरू झाली. सुरवातीला बॅनर व बाईक होत्या. त्यानंतर कलषधारी, गुढीधारी सुवासिनी, ध्वजधारी पुरुष होते. शोभायात्रेत ढोलपथक, ताशा, लेझीम, होळी, श्रीराम पंचायतन, नमन कृष्ण लीला, संतशिरोमणी गजानन महाराज देखावा, श्री रामानंदाचार्य यांची मूर्ती, बेटी बचाव देखावा, संत गडगेबाबांचा देखावा, धर्मक्षेत्र, खालू बाजा, ब्लड इन नीड माहिती देखावा, भजन, माऊलीचा रथ, संत मांदि आळी, बारा बलुतेदार असे देखावे व चित्ररथ सर्वांचे आकर्षण होते. शोभायात्रेत सहभागी भाविकांना पाणी, सरबत व लाडू वाटप करण्यात आले. या शोभायात्रेची सांगता श्रीराम मंदिरात झाली. श्रीराम मंदिर संस्था अध्यक्ष उर्मिलाताई घोसाळकर यांनी मिरवणुकीतील भाविकांचे स्वागत केले. तेथेच महाप्रसाद देण्यात आला. याप्रसंगी श्रीराम मंदिराचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते. यावेळी कानिफनाथ महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com