रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सावंत, लुडबे विजेत्या

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सावंत, लुडबे विजेत्या

swt231.jpg
90810
मृणाल सावंत
swt232.jpg
90811
दिया लुडबे

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सावंत, लुडबे विजेत्या
कुडाळः श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ, हिंदळे-भंडारवाडा (ता. देवगड) यांच्यावतीने गुढीपाडवा मांडानिमित्त आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत खुल्या गटात पिंगुळी-कुडाळची मृणाल सावंत, तर लहान गटात मालवणची दिया लुडबे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ, हिंदळे-भंडारवाडा यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष परेश खोत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेत खुल्या गटात द्वितीय स्वरांगी खानोलकर (सावंतवाडी), तृतीय ऋत्विक निकम (रत्नागिरी), उत्तेजनार्थ दिक्षा नाईक (पिंगुळी), तर लहान गटात द्वितीय सेजल शेटये (देवगड), तृतीय आरव आईर (पिंगुळी), उत्तेजनार्थ मंत्रा कोळंबकर यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परीक्षण दीपक तारकर, मोहन हिंदळेकर (मुंबई) यांनी केले. उद्धाटन व बक्षीस वितरण प्रसंगी सरपंच मकरंद शिंदे, अध्यक्ष परेश खोत, प्रशांत खोत, कमलाकर मयेकर, मंगेश मयेकर, विजय शेटये, समील हळदणकर, मनोज जाधव, बबन शेटये, अनिकेत हिंदळेकर, किरण हळदणकर, योगेश पाटील, दयानंद तेली, भाई मांजरेकर, दीप्ती खोत आदी उपस्थित होते.
..............

swt233.jpg
L90812
पाटः येथील हायस्कूलमध्ये इंग्रजी दिवस साजरा करण्यात आला.

पाट हायस्कूलमध्ये इंग्रजी दिवस साजरा
कुडाळः इंग्रजी विषयाचे महत्त्व पटविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह पाट हायस्कूलमध्ये इंग्रजी दिवस साजरा करण्यात आला. मुलांमध्ये इंग्रजी विषयाची भीती घालवण्यासाठी व त्याबाबत आवड निर्माण व्हावी, या हेतूने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही पाचवी ते नववी आणि इंग्रजी माध्यमाच्या पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधानाने करण्यात आली. विविध संवाद, कथा, नृत्य, भाषणे व खेळाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्था संचालक संजय ठाकूर, मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी गुरुनाथ केरकर, ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत, जान्हवी पडते, ज्येष्ठ शिक्षक बोंदर, इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक तानाजी काळे, आंबेरकर, एकनाथ जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी राऊळ यांनी, तर आभार नेहा ठाकूर या विद्यार्थिनीने मानले. इंग्रजी विषयाचे शिक्षक पी. एस. जाधव, साळगावकर, मोडक यांनी यांनी नियोजन केले.
.............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com