संक्षिप्त

संक्षिप्त

फोटो ओळी
- rat23p3.jpg ःKOP23L90819 खेड ः समर्थ कृपा विद्यालयात दीक्षांत समारंभप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे.

समर्थ कृपा विद्यालयात दीक्षांत समारंभ
खेड ः तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ जल्लोषात पार पडला. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते सरस्वतीदेवीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. यानिमित्त नर्सरी ते सीनियर केजी वर्गातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. जादुगार अरविंद तांदणे यांनी जादूचे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. तांदणे यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवत वाहवा मिळवली. एल. के. जी. (लिली) च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत कौतुकाची थाप मिळवली. जादुगार अरविंद तांदणे, नंदेश खेडेकर यांचा संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे, शालेय समिती चेअरमन उदय शेट्ये, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. एस. एस. अली, पर्यवेक्षक ए. एच, घोसाळकर आदी उपस्थित होते.

मुलांना गडकिल्ले सफर करण्याची गरज
खेड ः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व वारसा असलेले गडकिल्ले आजही साक्ष देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लहान मुलांना वयातच कळावे म्हणून पालकांनी व आपणही याकडे लक्ष वेधून घेत गड सफर करावी, असे आवाहन युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. गडकिल्ल्यावर भटकंती करण्यासाठी पालकांकडून पाठिंबा दिला जातो. काही पालकांकडून पाठिंबा दिला जात नाही असं का? तालुक्यातील संस्था लहान मुलांना मोहिमा आयोजित करत आहेत. आपल्या भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, गडकोटविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी छोट्या ट्रेकर्ससाठी गडकिल्ल्यावर मोहीम राबवण्यात येत आहेत. तसेच गडकोटांचा वारसा हा तरुण पिढीला पोचवला गेला पाहिजे व त्यांच्या मनामध्ये रूजवला गेला पाहिजे, असे युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी म्हटले आहे. मुलांना आपल्या जवळपासच्या गडकिल्ल्याची माहिती मिळते. किल्ल्याचे महत्व, इतिहास, संस्कृती व त्यांना संवर्धनाची मनामध्ये जाणीव निर्माण होते. मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते तसेच खेळांमध्ये आपल्या करिअरमध्ये ऊर्जा, प्रेरणा मिळते, असे पत्रकात सागवेकर यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com