सावर्डे ः सह्याद्रीच्या कलाकारांच्या कुंचल्यातून मुंबईच्या सौंदर्यात भर

सावर्डे ः सह्याद्रीच्या कलाकारांच्या कुंचल्यातून मुंबईच्या सौंदर्यात भर

फोटो ओळी
-rat२३p३५.jpg-KOP२३L९०८६५ मुंबई ः सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांनी रंगवलेली भिंत.
-rat२३p३६.jpg ः KOP२३L९०८६६ काही ठिकाणी उंच असलेल्या भिंती रंगवण्यासाठी परातीही बांधाव्या लागल्या.
-------------
सह्याद्रीच्या कलाकारांच्या कुंचल्यातून मुंबईच्या सौंदर्यात भर

भिंतींचे सुशोभन ; मुंबई महानगरपालिकेने दिले काम

सावर्डे, ता. २३ ः कोकणातील चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे असणारे सह्याद्री कला महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक अग्रणी कला महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. येथून गेल्या ३२ वर्षात अनेक विद्यार्थी कलाशिक्षण घेऊन बाहेर पडले. यातील बहुतेक विद्यार्थ्यांनी कलेच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून, येथे शिक्षण घेतलेले काही कलाकार गेले ३ महिने मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी मोकळ्या भिंतींवर विविध चित्रे रेखाटून शहराचे सुशोभीकरण करण्याच्या कामात मग्न आहेत.
ज्येष्ठ चित्रकार आणि शिल्पकार प्रकाश अर्जून राजेशिर्के यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे कला महाविद्यालय एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे. येथे रेखा आणि रंगकलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या कलाकार हेमंत सावंत, अमेय कोलते, मयुरेश खळे, प्रशांत आग्रे, किरण खापरे, प्रणीत मोहिते, अल्पेश बंडबे, समीर घडशी यांना मुंबई महानगरपालिकेकडून अंधेरी पूर्व विभाग, मेट्रो कारशेड या ठिकाणी भिंतींचे सुशोभन करण्याचे काम दिले आहे. या कलाकारांनी कलाविष्कारातून मुंबईच्या सौंदर्यात भर घातली आहे.
सलग तीन महिने हे कलाकार आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून विविध चित्राकृती रेखाटत अंधेरी पूर्व विभागातील भिंती बोलक्या करत आहेत. एकूण ५० हजार चौरस इंचाचे हे काम प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आले असून, मार्चअखेरीस ते पूर्णत्वास जाणार आहे. काही ठिकाणी भिंतीची उंची २५ फुटांपर्यंत असल्याने बांबूच्या पराती बांधून कलाकारांना काम करावे लागले आहे. पाण्यात विरघळणाऱ्या डिस्टेंपर रंगांमध्ये या भिंती रंगवल्या जात आहेत. भिंतींवरील चित्रे ही अमूर्त आकारासह मॉडर्न आर्ट प्रकारातील क्रिएटिव्ह स्वरूपाची आहेत.
_______
चौकट
अविस्मरणीय अनुभव

बांबूच्या पराती बांधून उंच भिंतींवर चित्रे रेखाटण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. चित्रे रेखाटताना आम्ही आमच्या कामात एवढे तल्लीन होऊन जायचो की, आपण २५ फुटांच्या उंचीवर आहोत हे विसरून जायला व्हायचे. चित्रे रेखाटताना उन्हाचा त्रास होत होता; मात्र हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. भिंतीचे सुशोभन करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय होता. यासाठी आम्हाला ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्रकाश राजेशिर्के सर आणि सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव सर, प्रा. अवधूत खातू यांचे मार्गदर्शन लाभले.
--अमेय कोलते, कलाकार
___________________________________

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com